नगरकरांचे भयमुक्‍तीचे स्वप्न मीच पूर्ण करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : शहराची दशा अन्‌ दिशा बदलून टाकून आधुनिक चेहरा देणार

नगर – नगर शहर भयमुक्‍त करणार असल्याची भाषा केली जाते. परंतू शहराला कोणापासून भय आहे. तुमच्यापासून शहराला भय आहे. त्यामुळे तुमचे भय घालवावे लागणार आहे. शहरात गुंडगिरी कोण कोण करते हे माहित आहे. त्यामुळे आता नगरकरांचे भयमुक्‍तीचे स्वप्न मीच पूर्ण करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नगर भयमुक्‍त करण्यासाठी कोणाचीही गय केली जाणार नाही. मी धमकी देत नाही. पण कायदाप्रमाणे कायदाचा दंडूका मारण्यात येईल, असे ते म्हणाले. यावेळी नगर शहराची दशा अन्‌ दिशा बदलून टाकून आधुनिक चेहरा देवू असे आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

महापालिका निवडणुकीत भाजपच्या प्रचाराची सांगता गांधी मैदानात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आमदार सुरेश धस, माजी आमदार बबनराव पाचपुते, महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे, ऍड. अभय आगरकर, सुनील रामदासी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक शहराची प्रगती झाली पण नगर शहर आहे तसेच आहे. मूलभूत सुविधा देखील नाही. हे बदलले पाहिजे. आज शहरीकरण वाढले आहे.

खेडी ओस पडत असून शहरे बकाल झाली आहे. खेड्यातून माणसे शहरात येत आहे. परंतू त्यानुसार सुविधा मिळत नाही. त्यामुळे कचरा व सांडपाण्याचा प्रश्‍न निर्माण होवून शहर अस्वच्छ होत आहे. शहरात नागरी सुविधा मिळत नाही. त्या देण्याची व्यवस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. शहर वाढू लागल्याने त्याला शिव्याशाप न देता त्या शहराचा विकास करण्याचे धोरण मोदींनी राबविले. यापूर्वीच्या सरकारकडून शहरांच्या विकासासाठी 5 ते 6 हजार कोटी रुपये तरतूद होती. ती आता 24 ते 26 हजार कोटी करण्यात आली आहे. त्यामुळे शहराचा झपाट्याने विकास होत आहे.
ते पुढे म्हणाले. सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे नदी नाल्यामधील प्रदुषण वाढत आहे.

आज नगरपालिका व महापालिकांच्या हद्दीतील मैला या नद्यामध्ये वाहत आहे. त्यामुळे जमिनी देखील दुषित झाल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी सांडपाण्याची प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात येत आहे. ते प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांना देण्यात येत आहे व शुद्ध पाणी पिण्यासह जमिनीला वापरण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. सांडपाण्याच्या प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांना देवून त्यातून महसूल मिळविण्याची संधी सरकारने उपलब्ध करू दिली आहे. तसेच घनकचरा व्यवस्थापन देखील काळाजी गरज झाली आहे.

कचरा साठवूण ठेवल्यास तो टाईम बॉम्ब ठरणार आहे. त्याचा कधी स्फोट होईल आणि प्रदुषण वाढले हे सांगता येणार नाही. त्यामुळे या घनकचऱ्यापासून कोळसा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन होवून शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. गरिबांसाठी पंतप्रधान आवास घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचा फायदा घ्यावा. जेवढी घरे लागतील तेवढी देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

टक्‍केवारीच्या गोष्टी कराल तर घरी पाठवेल
महापालिकेत भाजपची सत्ता येणार आहे. त्यामुळे सर्वच नगरसेवकांनी या संधीचा फायदा घेवून शहर विकासाची कामे केली पाहिजेत. टक्‍केवारीचा गोष्टी कराल तर घराचा रस्ता दाखविण्यात येईल. भले एक महापालिका गेली तरी मला चालेल. मला काहीच फरक पडणार नाही. पण नगरकरांनी टाकलेला विश्‍वासाला तडा जाणार असे काम नगरसेवकांनी करू नये. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या पाठीशी मी स्वतः उभा राहून शहरातील कामे करू घेईल. असे ना. फडणवीस म्हणाले.

थोरात, विखे तालुक्‍याचे मंत्री
राज्यात नगरचा मोठा दबदबा होता. केंद्र व राज्यात 15 वर्ष सत्ता असतांना कॉंग्रेस व राष्ट्रवादीला शहराच्या विकासासाठी काहीच करता आले नाही. जिल्ह्यात मोठे नेते आहे. मंत्री देखील होती. परंतू त्यांनी कधी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नगर शहराकडे पाहिले नाही. या सर्व नेत्यांनी आपला तालुकाचे नेते राहिले. विखे, थोरात हे तालुक्‍याचे मंत्री राहिले. त्यांनी कधीही नगर शहर विकासासाठी प्रयत्न केले नाही. मी चार वर्षात काय केले अन्‌ दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांनी 15 वर्षांत काय विकास कामे केली. हे समोरासमोर एका व्यासपीठास चर्चा करण्याची माझी तयारी आहे. त्यांनी पुढ द्यावे अन्‌ चर्चा करावी असे आव्हान ना. फडणवीस यांनी दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)