नक्षीदार पणत्यांनी बाजारपेठ सजली

पिंपरी – दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. बाजारात पारंपरिक पणत्यांबरोबर राजस्थान, उत्तर प्रदेश मधूनही आकर्षक दिवे विक्रीसाठी दाखल झाले आहे. वाहतूक खर्च वाढल्याने पणत्यांच्या दरामध्ये तीन टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे.

मागील काही वर्षांपासून विद्युत पणत्यांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. मात्र, मातीच्या पणत्यांनाही मागणी कायम आहे. यंदा बाजारात विविध आकाराचे, आकर्षक कलाकूसर केलेल्या पणत्या, दिवे दाखल झाले आहे. यामध्ये हृदयच्या आकाराच्या पणत्यांना जास्त मागणी असल्याची माहिती विक्रेता रोहन जाधव यांनी दिली. तसेच पानासारख्या आकाराचे, चौकोनी, स्टॅंड दिवे व गोल दिव्यांवर आकर्षक रंग देण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मोठ्या आकारातील दिवे उत्तर प्रदेशमधून मागविण्यात आले आहेत. विविध रंगी हे दिवे आकर्षक आहेत. राजस्थान, उत्तर प्रदेश येथून नक्षीदार पणत्यांची आवाक झाली आहे. तसेच बाजारात स्टील व जर्मलपासून तयार केलेले फ्लोटींगचे दिवे दाखल झाले आहेत. या दिव्यांमध्ये मेण असल्याने नागरिकांची या दिव्याला देखील मागणी होत आहे. फ्लोटींगच्या 10 दिव्याचे पॅकींग 40 रूपयाला मिळत आहे. तर मेणाचे साधे दिवे 25 रूपये डझनने मिळत असल्याची माहिती विक्रेता रविंद्र वाणी यांनी दिली.

गालिचा रांगोळीच्या साच्यांना मागणी
प्रत्येक सणामध्ये घरासमोर रांगोळीला खूप महत्त्व आहे. मात्र, महिलांकडे दिवाळीमध्ये कामाचा भार जास्त असतो. त्यामुळे त्यांना रांगोळी काढायला वेळ मिळत नसल्याने रांगोळीचे साचे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी दाखल झाले आहेत. बाजारात सर्वात खुलून दिसणाऱ्या विविध प्रकारचे 250 आकर्षक साचे महिलांचे लक्ष वेधून घेत आहेत. याचबरोबर रांगोळी स्टीकर, रांगोळी पेन बाजारात पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यंदा गालिचा रांगोळीचे मोठे साचे मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध असून महिलांची त्याला वाढती मागणी आहे. रांगोळीसाठी दहा रंगाचे दहा पाकीट तयार करण्यात आले आहे. रांगोळीचे दर “जैसे थे’ असल्याची माहिती बापू वांद्रे यांनी दिली.

पूजेचा माठ – 5 नग – 60 रूपये
हृदयाच्या आकाराचे दिवे – 12 नग – 40 रूपये
स्टॅंड दिवे – 2 नग – 40 रूपये
उत्तर प्रदेश दिवा – 1 नग – 60 रूपये.
साधे दिवे – 12 नग – 20 रूपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)