नक्षल “कनेक्‍शन’प्रकरण : अॅड. सुरेंद्र गडलिंग यांचे कारागृहातच उपोषण?

प्रशासनाकडून दुजोरा नाही 

पुणे – नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले अॅड. सुरेंद्र गडलिंग यांनी येरवडा कारागृहात उपोषण सुरू केल्याचे समजते. मात्र, कारागृह प्रशासनाकडे अजून कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे.

अॅड. गडलिंग यांनी कारागृहात उपोषण सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून गुरूवारी सायंकाळी मिळाल्यानंतर कारागृह विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला. अॅड. गडलिंग यांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी कारागृह प्रशासनाला अर्ज किंवा निवेदन देणे गरजेचे होते. मात्र, अजून अशा प्रकारचा अर्ज प्रशासनाला दिला नसल्याची माहिती कारागृह विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. एल्गार परिषद आयोजन आणि त्यानंतर भीमा-कोरेगाव येथे हिंसाचार उसळला होता. या दोन्ही प्रकरणांचा पुणे पोलिसांनी तपास सुरू केला होता. यात बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या साथींकडून एल्गार परिषदेच्या आयोजनासाठीआर्थिक मदत देण्यात आली, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. सोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, रोना विल्सन यांना अटक करण्यात आली होती.

त्यांच्याकडून लॅपटॉप, काही कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. इ-मेल संपर्क, कागदपत्रांच्या पडताळणीत अॅड. गडलिंग, सेन, राऊत, ढवळे, विल्सन बंदी घातलेल्या नक्षलवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळाली होती. अॅड. गडलिंग, सेन, राऊत, ढवळे, विल्सन न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)