नक्षलींच्या दोन म्होरक्‍यांची 68 लाखांची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली – बिहारमधील माओवादी नक्षलवाद्यांचे म्होरके असणाऱ्या दोन भावांची 68 लाख रूपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) जप्त केली. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

ईडीने कारवाई केलेल्या आणि नक्षलींचे म्होरके असणाऱ्या भावांची नावे प्रद्युम्न आणि प्रमोद शर्मा अशी आहेत. त्यांच्या मालकीचे े प्लॉट, घर आणि बॅंकेतील ठेवींवर टाच आणली गेली. कंत्राटदारांकडून खंडणी उकळून त्यांनी पैसे जमवल्याचा आरोप आहे. संबंधित कंत्राटदारांचीही ईडीकडून चौकशी केली जात आहे. गुन्ह्याच्या स्वरूपात गैरमार्गाने मिळवलेला पैसा शर्मा बंधूंनी मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केल्याचे उघड झाले आहे.

ईडीने नक्षली म्होरक्‍यांच्या विरोधात केलेली ही दुसरी कारवाई आहे. मागील महिन्यात झारखंडमधील नक्षली म्होरक्‍या संदीय यादव याची 86 लाख रूपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहीम तीव्र केली आहे. अशातच ईडी आणि राष्ट्रीय तपास संस्थेनेही (एनआयए) कारवाईचे सत्र अवलंबले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)