नक्षलवाद ही राष्ट्रीय समस्या – रविंद्र साठे

निगडी – नक्षलवाद ही राष्ट्रीय समस्या असून, त्यासाठी विकासात्मक कार्यक्रम व सशस्त्र कारवाई एकत्र राबविणे आवश्‍यक असल्याचे मत नक्षलवादाचे अभ्यासक रविंद्र साठे यांनी व्यक्‍त केले.

मॉडर्नच्या वसंत व्याख्यानमालेत नक्षलवादाबाबत प्रबोधन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्याख्यानमालेचे संयोजक शरद इनामदार, नगरसेवक सचिन चिखले व संस्थेच्या सदस्या अमिता किराड आदी उपस्थित होते.

नक्षलवादावर प्रबोधन करताना त्यांनी प्रथम नक्षलवाद समस्या निर्माण होण्याची पार्श्वभूमी सांगितली. साम्यवादी विचारातून प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढणारी व हिसांचाराच्या तत्त्वज्ञानातून निर्माण झालेली ही संघटना होती. शासकीय भ्रष्टाचार, गरिबी, जातीयता, अतिदुर्गम प्रदेश, आदिवासी समाज पिळवणूक, प्रादेशिक, आर्थिक विषमता यामुळे तेथील युवक वर्ग नक्षलवादाकडे आकर्षिला गेला, असे ही ते म्हणाले.

रवींद्र साठे म्हणाले की, घनदाट जंगलातील वास्तव्य प्रभावी गुप्तचर यंत्रणा तसेच काही देशांकडून होणारी मदत तसेच अन्य फुटिरतावादी संघटनांशी संधान यामुळे नक्षलवादाचा प्रभाव वाढत गेला. राजकीय इच्छाशक्‍तीचा अभाव, विकासाच्या योजनांची अपुरी कार्यवाही तसेच सुरक्षा यंत्रणांमध्ये नेतृत्व आभाव, प्रेरणा अनुशासन, प्रशिक्षणाचा अभाव आणि स्थानिक प्रश्नाविषयी पुरेशी संवेदनशीलता नसल्यामुळे आजपर्यंत या समस्येचे पूर्णतः निराकरण होवू शकले नाही. त्यावरील उपायाबाबत त्यांनी सांगितले की, केवळ कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नसून त्यामागील सामाजिक आर्थिक कारणांचा सखोल अभ्यास व जनजागृती होणे आवश्‍यक आहे. स्थानिक आदिवासींमध्ये सरकारबद्दल विश्वास निर्माण करून लोकसहभाग वाढविणे आवश्‍यक आहे.

सूत्रसंचालन दीपा वायकोळे यांनी केले तर आभार लीना पगारे यांनी व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)