नक्षलवाद्यांनी छत्तीसगडमध्ये केलेल्या स्फोटात 2 ठार

संग्रहित छायाचित्र.

रायपुर – नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुखमा जिल्ह्यात केलेल्या स्फोटात एका महिलेसह दोन जण ठार झाले. आयईडीद्वारे शुक्रवारी रात्री मेतागुडेम या गावात हा स्फोट घडवण्यात आला. तथापी त्याची माहिती पोलिसांना रविवारी रात्री मिळाली. या खेड्याच्या बाह्य भागात हा स्फोट घडवण्यात आला. हा भाग तसा निर्मनुष्य असल्याने त्याची माहिती मिळण्यास विलंब झाला असे पोलिसांनी सांगितले.

स्फोटात ठार झालेल्या व्यक्तींची अजून ओळख पटलेली नाहीं. ते बहुधा या गावचेही रहिवासीही नसावेत असा कयास आहे कारण गावकऱ्यांनी त्याबद्दल काहीही तक्रार दिलेली नाही. साधारणपणे सुरक्षा जवानांना लक्ष्य करण्यासाठी माओवाद्यांकडून अशा स्वरूपाचे आयईडी स्फोट घडवले जातात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)