नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस ठार 

दंतेवाडा: छत्तीसगडमधील माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन पोलिस ठार झाले आहेत. पुढील महिन्यात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनापूर्वीच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यासाठी दूरदर्शनचे तीन सदस्यांचे पथक नक्षलग्रस्त दंतेवाडा जिल्ह्यात गेले होते. तेंव्हा माओवाद्यांनी हा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अन्य दोन पोलिसही जखमी झाले आहेत.

दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर गावामध्ये पोलिसांचे पथक नियमित गस्तीसाठी गेले होते. त्यावेळी दूरदर्शनचे पथकही पोलिसांसमवेत होते, असे नक्षलविरोधी मोहिमेचे पोलिस महानिरीक्षक पी. सुंदर राज यांनी सांगितले. नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दूरदर्शनचे कॅमेरामन अच्युतानंद साहू, पोलिस उपनिरीक्षक रुद्र प्रताप आणि असिस्टंट कॉन्स्टेबल मंगालू हे ठार झाले. या हल्ल्यामध्ये साहू हे जबर जखमी झाले होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साहू हे मूळचे ओडिशातील रहिवासी होते. दूरदर्शनचे एक वार्ताहर आणि सहायक सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)