नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात डीआरजीचे चार जवान जखमी

रायपूर – छत्तीसगडच्या नक्षलप्रभावित सुकमा जिल्ह्यात आईडीचा स्फोट झाला असून त्यात डीआरजीचे चार जवान जखमी झाले आहेत. हा बॉम्बस्फोट नक्षलवाद्यांनी घडवून आणल्याची दाट शक्‍यता आहे. फुलबागडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सरसीट्टी गावाजवळच्या जंगलात आईडीचा स्फोट घडवून आणण्यात आला. ही घटना डीआरजीचे जवान नक्षलवादविरोधी मोहिमेवर जात असताना घडली, अशी माहिती डीआयजींनी दिली.

या स्फोटानंतर घटनास्थळी तातडीने कुमक पाठवण्यात आली असून जखमी जवानांपर्यंत जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याच महिन्यात मंगळवारी (दि. 13) सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफची पेरलेले सुरुंग शोधणारी गाडी स्फोटात उडवून दिली होती. यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) नऊ जवान शहीद झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)