नक्षलवाद्यांच्या आर्थिक मदतीवर केंद्रीय यंत्रणांची नजर 

संग्रहित छायाचित्र.

 

रायपूर : छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांना पुरवण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीवर आता केंद्रीय यंत्रणा नजर ठेवणार आहे. नक्षलींच्या  आर्थिक मदतीपासून धान्य तसेच शस्त्रास्त्रांचे नेटवर्क संपुष्टात आणण्याकरता एनआयए, ईडी आणि प्राप्तिकर विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाच्या सुकाणू समितीत गृह सचिव, पोलीस महासंचालक, नक्षलविरोधी मोहिमेच्या प्रमुखांना सामील करण्यात आले आहे. टेरर फंडिंग नेटवर्क नष्ट करण्यासाठी स्थापन पथकावर गृहमंत्रालयाची देखरेख असणार आहे.

एनआयए आणि ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱयांची मंगळवारी दिल्लीत बैठक पार पडली. एनआयए मुख्यालयात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. छत्तीसगढसोबत बिहार, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये देखील टेरर फंडिंग संपुष्टात आणण्यासाठी संयुक्त मोहीम राबवली जाणार आहे. यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी ईडीला सोपवण्यात आली आहे.

नक्षलींना आर्थिक मदत करणाऱयांची यादी ईडी तयार करणार आहे. छत्तीसगढमध्ये तैनात ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागील महिन्यातच नक्षलींना रक्कम पुरविणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवल्याचे सांगण्यात आले. नक्षलींना मदत करणाऱ्यांमध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था, आदिवासींच्या नावावर काम करणाऱया संस्था आणि काही उद्योजक देखील सामील आहेत. या कंपन्यांचे बस्तरमध्ये खाणप्रकल्प सुरू असल्याने ते नक्षलींना निधी उपलब्ध करत असल्याचे समोर आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)