नक्षलवाद्यांच्या अर्थकारणाचाही तपास एनआयए करणार

नवी दिल्ली- नक्षलवादी म्होरक्‍ये आणि त्यांच्या निकटवर्तीयांचा ठावठिकाणा शोधून त्यांच्यावर कारवाईसाठी नियुक्‍त केलेले “एनआयए’चे विशेष पथक नक्षलवाद्यांच्या मोठ्या आर्थिक व्यवहारांचा आणि आर्थिक हितसंबंधांचाही तपास करणार आहे. नक्षलवाद्यांची मुले उच्चशिक्षणासाठी मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये जात असतात. त्यासाठी या नक्षली म्होरक्‍यांकडे कोठून पैसा येतो याचाही छडा ही टीम लावनार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. “एनआयए’ अंतर्गत अशी खास जबाबदारी सांभाळणारी एक शाखा सुरू करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने नुकतीच मंजूरी दिली.

काश्‍मीरातील विभाजनवाद्यांच्या दहशतवाद्यांच्या आर्थिक हितसंबंधांचे धागेदोरे सापडू लागल्यानंतर गृहमंत्रालयाने दहशतवाद्यांच्या अर्थकारणाला नेस्तनाबुत करण्याची जबाबदारीही “एनआयए’कडे सोपवली होती. त्या जबाबदारी अंतर्गत “एनआयए’ने हुर्रियतच्या काही नेत्यांना आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली होती. त्यामध्ये हिज्बुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या सय्यद सलाहुद्दीन आणि कट्टरवादी सय्यद अली शाह गिलानीच्या जावयाचाही समावेश आहे.”एनआयए’च्या विशेष विभागांतर्गत नक्षलवाद्यांना होणारे अर्थसहाय्य, आर्थिक देवाण घेवाण आणि अन्य स्रोतांबाबत तपास केला जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली मंजूरी केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे, असे अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)