नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या झारखंडमध्ये शरण

संग्रहित छायाचित्र.

रांची – तब्बल तीन राज्यांमध्ये वॉन्टेड असणारा माओवादी नक्षलवाद्यांचा म्होरक्‍या कमलेश गंजू उर्फ बिरसाईजी गुरूवारी झारखंडमध्ये शरण आला. त्याच्या अटकेसाठी उपयुक्त ठरणारी माहिती मिळवण्याच्या उद्देशातून सुरक्षा यंत्रणांनी 25 लाख रूपयांचे इनाम जाहीर केले होते. कमलेश झारखंडबरोबरच बिहार आणि छत्तिसगढमधील विविध नक्षलवादी कारवायांत सामील होता.

तो 23 वर्षे नक्षलवादाच्या मार्गावरून चालला. मात्र, माओवादाचा वीट आल्याने आणि कौटूंबिक जबाबदारींविषयी उपरती झाल्याने त्याने नक्षलवादाचा मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. अखेर त्याने झारखंड पोलिसांपुढे शरणागती पत्करली. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी तो नक्षलवाद्यांच्या संपर्कात आला.

झारखंडचा रहिवासी असणाऱ्या कमलेशची शरणागती आणि शस्त्रे खाली ठेवण्याचा निर्णय तिन्ही राज्यांमध्ये सक्रिय असणाऱ्या सीपीआय(माओवादी) या नक्षली संघटनेसाठी मोठाच हादरा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)