नक्षलवाद्यांकडून जवानांची हत्या ही मानवी हक्कांचे उल्लंघन नाही

नवी दिल्ली, दि. 20 : छत्तीसगडमध्ये यावर्षी 24 एप्रिल रोजी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये 25 सुरक्षा रक्षक मारले गेले होते. मात्र ही घटना मानवी हक्कांच्या उल्लंघनाची आहे, असे म्हणता येणार नसल्याचे “सीआरपीएफ’ने म्हटले आहे. या हल्ल्याच्या चौकशीचा अहवाल माहितीच्या अधिकार कायद्याखाली उपलब्ध करून देण्यास “सीआरपीएफ’ने नकार दिला आहे. मानवी हक्क कार्यकर्ते वेंकटेश नायक यांनी या अहवालाची मागणी “आरटीआय’खालील अर्जाद्वारे केली होती. नक्षलवाद्यांच्या हा हत्याकांडामध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचा दावा नायक यांनी केला होता.
“सीआरपीएफ’च्या सदस्यांकडून मानवी हक्कांचे उल्लंघन किंवा भ्रष्टाचार झाल्याचा किंवा न झाल्याचा दावा असल्यासच चौकशी अहवाल दिला जाऊ शकेल. अन्यथा “सीआरपीएफ’च्या चौकशी अहवालाला “आरटीआय’मधून वगळण्यात येते. या प्रकरणी मानवी हक्कांचे कोणतेही उल्लंघन झाल्याचे आढळत नाही. तसेच या प्रकरणात भ्रष्टाचाराचाही कोणताही आरोप नाही. “आरटीआय’ अर्जामध्येही तसा कोणताही आरोप केला गेलेला नाहीत्यामुळे या हत्याकांडाच्या चौकशीचा अहवाल माहिती अधिकारात दिला जाऊ शकणार नाही, असे “सीआरपीएफ’ ने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)