नक्षलवादी हल्ल्यात दूरदर्शनच्या कॅमेरामनसह दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू 

छत्तीसगड – छत्तीसगडच्या निवडणुकांआधी नक्षलवादी हल्ल्याचे वृत्त हाती येत आहे. या हल्ल्यात दूरदर्शनचा एक कॅमेरामन व दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रातील दंतेवाडा येथील अरणपूर जंगलात हा हल्ला झाला.

छत्तीसगढमध्ये सध्या निवडणुकांचा प्रचार चालू आहे. या पार्श्वभूमीवर वार्तांकन करण्यासाठी दूरदर्शनचे एक पथक दंतेवाडा येथे गेले होते. यावेळी अचानक नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दूरदर्शनचा कॅमेरामन आणि दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये उपनिरीक्षक रुद्रप्रताप, सहायक कॉन्स्टेबल मंगलू आणि डीडी न्यूजचे कॅमेरामन अच्युतनंद (दिल्ली) यांचा समावेश आहे. दरम्यान, हल्ल्यानंतर या परिसरात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली असल्याचे नक्षलवादविरोधी अभियानाचे प्रमुख पी सुंदर राज यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात म्हणजेच १२ आणि २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर नक्षलवाद्यांनी ग्रामस्थांना मतदान न करण्याचे आवाहन केले असून पोस्टर्सही लावली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)