नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. अनिलकुमार मौर्य असे शहीद जवानाचे नाव आहे. अनिलकुमार मौर्य हे उत्तर प्रदेशातील अमेठीतील रहिवासी होते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआरपीएफची २१२ बटालियन आणि छत्तीसगड पोलिसांच्या २०८ कोब्रो पथकाने संयुक्तपणे किस्तरम कॅम्पजवळ सर्च ऑपरेशन सुरू केले होते. यादरम्यान, नक्षलवाद्यांच्या गोळीबारात सहाय्यक उपनिरीक्षक अनिलकुमार गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तातडीने किस्तरम कॅम्पातील रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)