नकारात्मक जागतिक संकेतामुळे सोन्याच्या दरात घट 

नवी दिल्ली: जागतिक बाजारात सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर स्थानिक बाजारातूनही मागणी नसल्यामुळे शनिवारी सोन्याच्या दरात 10 रुपयांनी घट झाल्याचे दिसून आले.
मात्र, चांदीला उद्योग क्षेत्राकडून आणि नाणी तयार करणाऱ्यांकडून मागणी असल्यामुळे चांदीचे दर 100 रुपयांनी वाढले. दिल्ली सराफात शनिवारी स्टॅंडर्ड सोन्याचे दर 10 रुपयांनी कमी होऊन 31500 रुपये प्रति दहा ग्रॅम तर शुद्ध सोन्याचे दर 10 रुपयांनी कमी होऊन 31650 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर गेले.
काल सोन्याचे दर 225 रुपयांनी कमी झाले होते. शनिवारी तयार चांदीचे दर 100 रुपयांनी वाढून 38100 रुपये प्रति किलो या पातळीवर गेले. जागतिक बाजारात आज सोन्याचे दर 0.07 टक्‍क्‍यांनी तर चांदीचे दर 0 .04 टक्‍क्‍यांनी कमी झाले. दरम्यान, धार्मिक कारणामुळे शेअर आणि चलन बाजार गुरुवारी बंद होते.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)