नकारात्मकतेकडे सकारात्मक पाहा : शिवतारे

प्रभात वृत्तसेवा
पुणे – नकारार्थी विचार हा सर्वात घातक आहे. नकारात्मकतेकडे सकारात्मक होऊन पाहिले पाहिजे. कुठलीही गोष्ट पूर्णत्वास नेण्याची धडाडी आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रामाणिकपणे इच्छाशक्‍ती असेल तर आपण यशस्वी होऊ शकतो, असा सल्ला जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख, प्रा. सुरेश तोडकर, संस्थेच्या शाळा-महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, प्राचार्य उपस्थित होते.

इच्छाशक्‍ती, चिकाटी, काम करण्याचे धाडस, साहस असेल तर मनुष्य कोणत्याही आव्हांनाना सामोरे जाऊ शकतो. त्यासाठी आपला आत्मविश्‍वास वाढावा, यासाठी प्रयत्न करा. आवाक्‍याबाहेरच स्वप्ने पाहा. आपण कोणत्याही क्षेत्रात असो, त्यातून समाजकार्य घडवून आणले पाहिजे. त्यामुळे आपले आत्मबळ जागृत होते आणि आत्मप्रेरणा प्राप्त होते, असेही शिवतारे यांनी सांगितले.

डॉ. एकबोटे यांनी आपला हेतू आणि ध्येय स्पष्ट असला पाहिजे. त्यामुळेच व्यक्‍तिमत्व सुधारते. तसेच अब्दुल कलाम, लाल बहादूर शास्त्री यांचाही जीवनप्रवास संघर्षमय होते. ह्या सारख्या लोकांचा जीवन चरित्राचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करावा, असेही डॉ. एकबोटे म्हणाले. प्रा. शामकांत देशमुख यांनी स्वागत केले. डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. कल्याणी जोशी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)