‘नकळत सारे घडले’मधील नेहाच्या मातृत्वाची कसोटी!

परीच्या नाराजीचा करावा लागणार सामना

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत अत्यंत भावनिक वळण येऊ घातलंय. नेहा आणि प्रतापमधल्या गैरसमजांचं मळभ दूर होत असतानाच आता नेहाला परीच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. परी आणि नेहाईमधला मॅजिक बॉन्ड सर्वश्रूत आहेच. परीच्या जीवाला धोका असेल तर त्याची पहिली जाणीव नेहाला होते. माय-लेकीमधल्या या निरागस नात्याचा अनुभव प्रेक्षकांनी बऱ्याचदा मालिकेमधून घेतलाय. नेहा आणि परीमधल्या याच मॅजिक बॉंडवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. नेहाईचं आपल्यावर पूर्वीइतकं प्रेम राहिलेलं नाही असं परीला वाटतंय. त्याचमुळे आपला जीव धोक्यात घालून ती नेहाची परीक्षा घेण्याचं ठरवते. या परीक्षेत नेहा पास होणार का? परीचा जीव ती वाचवू शकणार का? माय-लेकीचं नात पुन्हा पूर्ववत होणार का? याची रंजक गोष्ट ‘नकळत सारे घडले’च्या पुढील भागांमध्ये उलगडणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)