नऊ लढाऊ ‘सूर्यकिरण’ विमानांच्या चित्तथरारक कसरती

पुणे – पदवी प्रदान समारंभाचा समारोप होताच सर्वांच्या नजरा सुदान ब्लॉकवर खिळल्या होत्या. इतक्‍यात प्रचंड आवाज करीत 9 विमाने सुदान ब्लॉकच्या मागून प्रचंड वेगाने पुढे आली. लाल आणि पांढरे पट्टे असलेल्या सूर्यकिरण विमानांनी एका मागोमाग एक कसरती दाखविण्यास सुरुवात केली. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग 29 आणि तेजस यांचा आकार तयार करत “सूर्यकिरण’ विमानांनी शानदार “सलामी’ दिली. आकाशातून प्रचंड वेगाने जमिनीकडे येऊन क्षणार्धात पुन्हा आकाशात झेपावणाऱ्या 9 विमानांनी उपस्थितांची दाद मिळविली.

“एनडीए’च्या 135 व्या पदवी प्रदान समारंभाच्या निमित्ताने सूर्यकिरण या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती दाखविण्यात आल्या. यापूर्वी “एनडीए’मध्ये 4 आणि 6 सूर्यकिरण विमानांनी कसरती केल्या होत्या; पण, आता सलग दुसऱ्या वर्षी 9 विमानांनी एकत्र कसरती करत भारतीय हवाई दलाची अचूकता, चपळता आणि वेग यांचे दर्शन घडविले.
आकाशात 90 अंशांच्या कोनात अक्षरशः सरळ उड्डाण करत ही विमाने डोळ्यांना दिसेनाशी होत असतं. त्यांचा आवाजही येत नव्हता. अशा शांत आणि स्तब्ध वातावरणात पुन्हा विमाने घोंघावण्याचा आवाज येई. वेगाने वर जाणाऱ्या आणि तितक्‍याच वेगाने पुन्हा जमिनीकडे येणाऱ्या “सूर्यकिरणां’नी उपस्थितांच्या मनाचा ठाव घेणारी अशी विविध प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये ऍरो, वाइन ग्लास, त्रिशूल असे विविध आकार बनवत या विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

-Ads-

सूर्यकिरण या लढाऊ विमानांचा तळ कर्नाटक येथील बिदर येथे आहे. “द शार्क’ या नावानेही ही ओळखली जाते. दीक्षांत समारोहासाठी हवाई प्रात्यक्षिक सादर करण्यासाठी नुकतेच त्यांचे आगमन पुण्यात झाले आहे. गेले काही दिवस ही विमाने लोहगाव येथे सराव करत होती. त्यानंतर “एनडीए’मध्येही त्यांनी सराव केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)