नऊ जागा महिलांसाठी राखीव!

वडगाव मावळ : प्रभाग आरक्षण सोडतीच्या वेळी महसूल भवनात नागरिकांनी गर्दी केली होती.
  • वडगाव नगरपंचायत : सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोडत

वडगाव मावळ (वार्ताहर) – येथील राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या वडगाव नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकाचा प्रभाग व आरक्षण सोडत कार्यक्रम शुक्रवारी (दि. 13) तहसील कार्यालयाच्या महसूल भवन येथे संपन्न झाला.

प्रभाग आरक्षण सोडत मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. वडगाव नगरपंचायती 17 प्रभाग असून, 9 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सर्वसाधारण महिला 5 जागा, नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला 3 जागा, सर्वसाधारण 4 जागा, नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण 2 जागा, अनुसूचित जाती सर्वसाधारण 1, अनुसूचित जाती महिला 1 व अनुसूचित जमाती सर्वसाधारण 1 अशा एकूण 17 प्रभागातील 17 जागा. या वेळी तहसीलदार रणजीत देसाई, मुख्याधिकारी वैभव आवारे, नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील, मंडलाधिकारी दत्तात्रय गवारी, संतोष चव्हाण, बजरंग मेकाले आदी उपस्थित होते. आरक्षणाच्या चिठ्ठी लहान मुलाने काढली.

प्रभाग, लोकसंख्या व आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक 1, लोकसंख्या 890 व अनुसूचित जमाती सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 2, लोकसंख्या 801 व सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 3, लोकसंख्या 878 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला ,
प्रभाग क्रमांक 4, लोकसंख्या 936 व नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 5, लोकसंख्या 972 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक 6, लोकसंख्या 821 व सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक 7, लोकसंख्या 922 व अनुसूचित जाती सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 8, लोकसंख्या 826 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक 9, लोकसंख्या 968 व सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 10, लोकसंख्या 888 व सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक 11, लोकसंख्या 927 व नागरिकाचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण,
प्रभाग क्रमांक 12, लोकसंख्या 860 व सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक 13, लोकसंख्या 835 व सर्वसाधारण महिला ,
प्रभाग क्रमांक 14, लोकसंख्या 845 व अनुसूचित जाती महिला ,
प्रभाग क्रमांक 15, लोकसंख्या 983 व सर्वसाधारण ,
प्रभाग क्रमांक 16, लोकसंख्या 815 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,
प्रभाग क्रमांक 17, लोकसंख्या 888 व नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला,

या वेळी वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत इच्छुक उमेदवार पक्षाचे कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते. काहींना मनासारखे प्रभाग व आरक्षण पडल्याने आनंद झाला. तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा दिसून आली. ज्यांनी निवडणुकीची तयारी केली त्यांनी पत्नीला लढवण्याचा निर्णय घेतला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)