नंदादेवी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच निवडणूक बिनविरोध

रावणगाव- दौंड तालुक्‍यातील आदर्श गाव नंदादेवी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध पार पडली. सरपंचपदी नाना लक्ष्मण धावडे यांची तर उपसरपंचपदी लक्ष्मीबाई तुकाराम आटोळे यांची निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लोणकर यांनी काम पाहिले. याप्रसंगी गावकामगार तलाठी शशिकांत सोनवणे, ग्रामसवक रवींद्र माळशिकार, रावणगांवचे पोलीस उपनिरिक्षक भानुदास जाधव, माजी उपसभापती उत्तम आटोळे, माजी सरपंच आबास धायतोंड, रमेश कोकणे, पोलीस पाटील राणी गावड तसेच हरिश्‍चंद्र चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)