नंदादेवी गावास आदर्श ग्राम पुरस्कार

रावणगाव- पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत देण्यात येणारा 2017-18 या वर्षीचा शरद आदर्श कृषी ग्राम पुरस्कार नंदादेवी (ता. दौंड) या गावास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6 ) देण्यात आला. प्रत्येक तालुक्‍यातून फक्त एकाच गावाला हा पुरस्कार देण्यात आला असून,नंदादेवी ग्रामपंचायतीने फळबागा लागवड, जलसंधारणाची आणि जलयुक्त शिवारची उत्कृष्ट कामे, मुक्तसंचार गोठे, जलशुद्धीकरण प्रकल्प, ठिबक सिंचन,पोल्ट्री फार्मिंग इत्यादी कामे चांगल्या प्रकारे केल्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार पुणे येथे देण्यात आला. हे गाव ऍग्री कल्चरल ट्रस्ट ऑफ बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी दत्तक घेतलेले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, कृषी पशुसंवर्धन विभागाच्या सभापती सुजाता पवार, दौंड पंचायत समिती सभापती झुंबर गायकवाड, नंदादेवी गावचे विद्यमान सरपंच आबासाहेब धायतोंडे, पोलीस पाटील राणी गावडे, उपसरपंच शांताबाई कोकणे, माजी सरपंच रमेश कोकणे, ग्रामविकास अधिकारी माळशिकारे आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)