नंदनवन गारठले,गोठले

महाबळेश्‍वरात यावर्षी दुसऱ्यांदा हिमकणांची मौज

महाबळेश्वर – महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर सध्या गारठले व गोठले असून येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव परिसरात थंडीचा चांगलाच कडका पडल्याने सर्वत्र दवबिंदू गोठून हिमकण जमा झाल्याचे चित्र आज पहावयास मिळाले. या वर्षीच्या थंडीच्या हंगामात आजही हिमकणांची मौज दुसऱ्यांदा पहावयास मिळाली. यापूर्वी 11 डिसेंबर रोजी असेच हिमकण पहिल्यांदा दृष्टीस पडले होते. दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही पर्यटन नगरी सज्ज झाली असून त्याची मौज लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी सुरु झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे आज वेण्णा तलाव परिसरात ठिकठिकाणी हिमकणांची दुलाई स्थानिकांसह पर्यटकांना पहावयास मिळाल्याने त्यांच्यात अनोखा उत्साह व आनंद पहावयास मिळाला. हवामान खात्याच्या नोंदीप्रमाणे आज महाबळेश्वर शहर परिसरातील निचांकी तापमान 9.6 अंश डिग्री सेल्सियस होते तर वेण्णा तलाव परिसरात ते जाणकारांच्या माहितीप्रमाणे दोन अंश ते तीन अंश इतके नीचांकी असावे. दरम्यान गुरुवार रात्रीपासून अचानक थंडीचा जोर वाढला. आज पहाटे तर तो आणखीनच वाढला.

यामुळे प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळापर्यंतच्या सुमारे दीड किलोमीटर परिसरात ठिकठिकाणी दवबिंदू गोठून हिमकण झमा झाल्याचे दिसून येत होते. नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णा तलावावरील बोटीमध्ये चढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर हिमकण ठिक ठिकाणी जमल्याने तो भाग पांढरा झाल्याचे दिसत होते. याच परिसरातील वाहनांच्या टपांवरही हिमकणांची चादर टाकल्याचे मनमोहक दृश्‍य दिसत होते. येथील हिमकण जमा करण्याचा आनंद सकाळी स्थानिकांसह पर्यटकांनी मनमुरादपणे लुटला. परिसरातील स्टॉबेरी फळांच्या बागा तसेच स्मृतीवन पठार हिमकणामुळे पांढरे शुभ्र झाल्याचे तसेच तेथील वेली, झाडे, झुडपे ही हिमकणाने गुरफटल्यामुळे पांढरे झाले होते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा यावर्षी दुसऱ्यांदा पाहिला मिळाल्याने तसेच नवीन वर्षाच्या स्वागता दरम्यानच पहावयास मिळाल्याने स्थानिकांसह पर्यटकांच्यात वेगळा उत्साह पहावयास मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)