नंदकुमार गुरव यांची निवड

सातारा – येथील निवृत्त महसूल अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार गुरव यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश कार्यकारीणीच्या ओबीसी आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. नुकतेच त्यांना या नियुक्तीचे पत्र पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

गुरव हे तहसिलदार पदावरून निवृत्त झाले असून महसूल अधिकारी कर्मचारी पतसंस्था, निवृत्त महसूल कर्मचारी संघटना आदींच्या माध्यमातून सक्रिय काम केले आहे. याशिवाय त्यांचा काव्यसंग्रह ही प्रकाशित झाला आहे. या निवडीबद्दल पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, एसबीआय इन्शुरन्सचे अधिकारी अप्पासाहेब गुरव यांनी सदिच्छा व्यक्‍त केल्या.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)