ध्वनीप्रदुषण टाळण्यासाठी निरीच्या शिफारसींची अंमलबजावणी करा

हायकोर्टाचे पालिकाप्रशासनांना आदेश

मुंबई – धार्मिक सण उत्सवाच्या काळात होणारे ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी नॅशनल इन्वायरोमेंटल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्युट (निरी) या संस्थे केलेल्या सर्व्हे नंतर सुचविलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करा असा आदेश उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व पालिका प्रशासनाला दिला.

विविध उत्सवांच्या निमित्ताने होणाऱ्या ध्वनी प्रदुषण आणि रस्त्यावरील बेकायदा मंडपाच्या पार्श्‍वभूमीवर आवाज फाऊंडेशन आणि ठाण्याचे डॉ. महेश बेडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत .त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम एस सोनक यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.

जून महिन्यात निरी या संस्थेने राज्यात ध्वनीप्रदुषणासंदर्भात नियमांची पूर्तता करण्यासंदर्भात सर्व्हे करून काही शिफारशी सुचविल्या आहेत . या शिफारशींचा अहवाल राज्यातील विविध पालिकेच्या आयुक्तांना पाठवावा आणि त्याची अंमलबजावणी कधी परत करणार त्याची माहिती मागवा असे निर्देश राज्य सरकारला देताना ध्वनीप्रदुषण कसे रोखता येतील त्याबाबत अभ्यास करण्याचे आदेश निरी संस्थेला दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)