ध्वनिप्रदूषणविरहित मिरवणूक काढा – गायकवाड

चिंबळी- गणेश विसर्जन मिरवणुक काढताना सर्व तरुण मंडळांच्या कार्यकर्ताना आव्हान करण्यात येथे की ध्वनिप्रदूषण आणि डीजेचा वापर न करता पारंपरिक पध्दतीने ढोलताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक शांतेत पार पाडावी, असे आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी केले.

गणेश उत्साहाच्या निमित्त मरकळ, गोलेगांव, सोळू, धानोरे, चल्होरी खु।।, केळगाव, चिंबळी येथे आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी गणेश मंडळांना भेट देऊन लोखंडे तालीम मंडळाच्या वतीने करण्यात आलेल्या प्राणप्रतिष्ठा गणेश मूर्तीची आरती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)