ध्वजारोहण आणि ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनास सुरुवात

शिक्षण महर्षी प. पू. बाप्पूजी साळुंखे यांचा मरनोत्तर गौरव पुरस्काराने सन्मान

भोर- येWrc फुले शाहू आंबेडकर विचार प्रसार चौथ्या साहित्य संमेलनाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांचे हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर झाला. यावेळी संविधान रॅली आणि ग्रंथ दिंडीचे उद्‌घाटन अंनिसचे प्रदेश कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
भोर एसटी बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर मंगळवार पेठ मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथ दिडी व रॅली काढण्यात आली. संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. रोहिदास जाधव, सतिश कुलकर्णी, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, माजी संमेलानाध्यक्ष डॉ. प्रदिप पाटील आदी सहभागी झाले होते. संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे सुदाम ओंबळे, सदाशिव गलांडे, डी. एस. गायकवाड, अनिल गरुड यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रंथ दालनाचे उद्‌घाटक विचारवंत सतीश कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरीत्र विषद करताना भरकटलेल्या या देशाला एका धाग्याने जोडण्याचे काम डॉ. आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले. या देशाला भविष्यातील स्वप्न साकार करायची असतील तर त्यांचे प्रत्येक विचार अमलात आणावे लागेल. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक प. पू. बाप्पूजी साळुंखे यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अभायकुमार साळुंखे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. व्यासपीठावर माजी आमदार संपत जेधे, भाऊसाहेब आंबवले, संस्थेचे विभागीय प्रमुख सीताराम गवळी, सदस्य अरुण सुळगेकर, शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य शामराव शिंदे, साहित्यीक उत्तम कांबळे, म.सा.प.चे पुणे कार्यवाह रावसाहेब पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब पवार यांनी केले. सूत्रसंचालन सुजाता पवार, राजेंद्र जेधे व आनंदा जाधव यांनी केले तर प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)