ध्वजाचा अवमान करणारांवर कायदेशीर कारवाईची भारताची मागणी

लंडन (ब्रिटन) – लंडनमधील पार्लमेंट स्क्वेअर येथे भारतीय ध्वजाचा अवमान करणारांवर कायदेशीर कारवाईची मागणी भारताने केली आहे. पंतप्रधान नरंद्र मोदी यांच्या भेटीदरम्यान बुधवारी पार्लमेंट स्क्वेअर येथे आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होऊन भारतीय तिरंगा ध्वजस्तंभावरून ओढून काढून फाडला होता. तेथे चोगम बैठकीसाठी 53 देशांचे ध्वज फडकवण्यात आले होते. या प्रकाराने आम्हाला अतिशय वेदना झाल्या आहेत. हे प्रकरण युके सरकारकडे नेण्यात आले असून वरिष्ठ पातळीवर त्याबाबत दिलगिरी व्यक्त करण्यात आलेली असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी काल पत्रकारांना सांगितले. ही कृती करणारे आणि त्यांना फूस देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाईची आमची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.

ध्वज फाडणारे आंदोलनकर्ते कॅमेऱ्यात बंदिस्त झालेले आहेत. मोदीविरोधी अल्पसंख्य बॅनरखाली मूळ पाकिस्तानी लॉर्ड अहमद यांच्या नेतृत्वाखाली खलिस्तानवादी आणि काश्‍मिरी विघटनवादी आंदोलकांनी हे काम केले आहे.
युकेमध्ये वारंवार भारताविरुद्ध चिथावणी देण्याचे काम करत असलेल्या अहमद यांच्यावर कारवाई करण्यासाठी युकेवर दबाव वाढत आहे.

ब्रिटिश सरकार भारतीय उच्चायुक्तालयाच्या संपर्कात असल्याची माहिती ब्रिटिश परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयाच्या प्रवक्‍त्याने दिली आहे.

या प्रकरणाचा तपास करत असल्याचे निवेदन स्कॉटलंड यार्डने दिले आहे. तर दुसरा ध्वज फडकवण्यात आल्याचे आणि तपास चालू असल्याचे महानगर पोलीसांनी निवेदन दिले आहे. या प्रकाराची मीडियानेही मोठ्या प्रमाणावर दखल घेतली आहे. लोकांनी या प्रकरणाने धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले सध्या अस्तित्वात असलेला ध्वज हा कोणत्या देशाचा ? हिंदुस्थानचा , भारताचा कि इंडियाचा ? देश गुलामगिरीतून स्वतंत्र होण्यासाठी स्वराज मिळविणे हा स्वताहाचा जन्मसिद्ध हहक असल्याची प्रतिद्य्ना करवून आपल्या जीवाची , संसाराची राखरांगोळी केली त्या हुतात्म्यांनी जो राष्ट्रध्वज उराशी कवताला त्यात मध्यभागी चरखा हे चिन्ह होते व हा ध्वज हिंदुस्तान अथवा भारत देशाचा होता तसा पाहावयास मिळतो का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)