ध्रुपद, अमोघ, सोहम, आशय यांना विजेतेपद

पुणे – सिद्धिविनायक रिऍन्टीज, साई प्रॉपर्टीज व पिं.चिं. महानगर चेस असो. यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील “मोरया प्रसाद’ सभागृहात संपन्न झालेल्या वयोगट जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत ध्रुपद पटारी, अमोघ हिरवे, शिवराज पिंगळे, सोहम सिन्हा व आशय वांगीकर यांनी अनुक्रमे 7, 9, 11, 13 व 17 वर्षांखालील गटाचे अजिंक्‍यपद पटकाविले.

7 वर्षांखालील गटात ध्रुपदने सहाही फेऱ्या जिंकून सहा गुणांसह विजेतेपद, तर विपुल होलेत 5 गुणांसह टायब्रेक आधारे उपविजेते पद मिळाले. सुशाग्र जैन, श्रेयस पाटील, युवराज पाटील, दिवित सहुजा, संभव भटेवरा, तनिष्क ठक्कर, आरूष डोळस व अक्षर झोपे यांनी अनुक्रमे तीन ते दहा क्रमांकात यश प्राप्त केले.

9 वर्षांखालील गटात अमोघने सर्व फेऱ्या जिंकत सहा गुणांसह विजेतेपद मिळविले. पूर्वा होले, आशिका काळे व आन्या रॉय या तिघींचेही समान 5 गुण झाले. टायब्रेक गुणांनुसार पूर्वाला उपविजेतेपद, तर आशिका व आन्याला अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळाला. शंतनू गायकवाड, आर्यन पाटेकर, शुभान बाहेती, दिव्या अब्दागिरे, अजय पलनीसामी व आर्यन मारभाल यांना अनुक्रमे पाचवे ते दहावे स्थान प्राप्त झाले.

11 वर्षांखालील गटात शिवराज पिंगळेनेही सहा गुणांसह विजेता व अंशुल वसवन्ती 5 गुणांसह टायब्रेक गुणांआधारे उपविजेता ठरला. ओम शिंदे, संजना सावंत, तेजस पाटील, शार्विल यादव, यश आगरवाल, संजय नाईक, आयुश लोखंडे व लाव्या मेनन यांनी अनुक्रमे तीन ते दहा क्रमांक प्राप्त केले.

13 वर्षांखालील गटात सोहम सिन्हा (6 गुण) विजेता, तर अमोघ कुलकर्णीने उपविजेतेपद प्राप्त केले. साहिल शेजल, ओम लामकाने, खुशाल बन्सल, तीर्थ शेवाळे, अथर्व शिंदे, सोहम भोईर, अर्जुन बोत्रे व इशान येवले यांनी अनुक्रमे तीन ते दहा क्रमांकात यश प्राप्त केले.

17 वर्षांखालील गटात आशय वांगीकरने विजेतेपद मिळविले. निरंजन पाटील, वेद मोने, ओंकार भिंताडे, सुदर्शन अय्यर व प्रसाद वाघुळदे या सर्वांचे समान 4 गुण झाले. टाय ब्रेक गुणांआधारे त्यांना अनुक्रमे दुसरे ते सहावे स्थान प्राप्त झाले. संस्कृती पाटील, प्रतिक मेहता, विराज जोशी व चिन्मय अमृतकर यांना अनुक्रमे 7 ते 10 क्रमांक मिळाले.

बुद्धिबळ कूटप्रश्‍न सोडविणे स्पर्धा
तीन वयोगटात झालेल्या बुद्धिबळ कूटप्रश्‍न सोडविणे या वेगळ्या प्रकारच्या स्पर्धेत 9 वर्षाखालील गटात आशिका काळेने 110 पैकी 95 गुण मिळवून विजेतेपद मिळविले. अमोघ हिरवे (93 गुण) उपविजेता ठरला. कुशाग्र जैन, आर्यन पाटेकर, श्रेयस पाटील, शंतनु गायकवाड, आर्य पाटील, अर्णव कोठावडे, शार्विल सुर्यवंशी व आदित्य आगरवाल यांनी अनुक्रमे तीन ते दहा क्रमांक मिळविले.

13 वर्षांखालील गटात तीर्थ शेवाळेने 100 पैकी 79 गुण मिळवित प्रथम क्रमांक व साहिल शेजलने (76) द्वितीय क्रमांक मिळविला. द्रोण बन्सल, ओम लामकाने, शिवराज पिंगळे, कुंज बन्सल, अमोघ कुलकर्णी, अथर्व शिंदे, कुशाग्र जैन व सर्वेश सावंत यांनी तीन ते दहा क्रमांकात यश प्राप्त केले.

17 वर्षाखालील गटात विराज जोशीने 100 पैकी 68 गुण मिळवून प्रथम क्रमांक तर सुजल पाटीलने 66 गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तीर्थ शेवाळे, ओंकार भिंताडे, संस्कृती पाटील, आशय वांगीकर, प्रेरणा पाटे, वेद मोने, क्षितीज कर्ण व अमित शहा यांनी अनुक्रमे तृतीय ते दहावे स्थान प्राप्त केले.

स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून पवन राठी व सहाय्यक पंच म्हणून कुणाल शिंदे, उमेश खेंगरे, गुरुनाथ कुलकर्णी, शुभम चतुर्वेदी, अच्युत हिरवे व विकास देशपांडे यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)