ध्येय समोर ठेऊन, झोकून देऊन काम करा

सुनिल पाटणकर यांचे प्रतिपादन

वाई – जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय समोर ठेवले पाहिजे. संकटांनी डगमगून न जाता खंबीरपणे त्यावर मात करून यश मिळवायला हवे म्हणूनच ध्येय समोर ठेवून झोकून देऊन काम करा, असे उद्‌गार पुण्यातील अपर्णा इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ उद्योगपती सुनिल पाटणकर यांनी काढले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या कन्याशाळा, कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग वाईच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. ज्योत्स्ना पाटणकर, शाला समिती अध्यक्ष डॉ. अभय देशपांडे, कनिष्ठ महाविद्यालय अध्यक्ष ऍड. प्रभाकर सोनपाटकी, अध्यक्षा नवीन मराठी शाळा सौ. जयश्री ओसवाल, शाला समिती सदस्य डॉ. प्रकाश सावंत, अविनाश जोशी, सौ. रश्‍मी शेवडे, सौ. भारती जैन, डॉ. चंद्रशेखर कांबळे, सौ. रेवती कैलास शिंदे आणि डॉ. निता यादव, प्राचार्या श्रीमती भारती झिमरे, संस्था प्रतिनिधी सौ. स्वाती शेंडे, सौ. रोहिणी गोखले, सौ. सुरेखा जाधव, सौ. विद्या राव, पर्यवेक्षक, चंद्रकांत ढाणे, कार्याध्यक्षा, सौ. सुरेखा जमदाडे, श्रीमती मनिषा वरखडे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेखा जमदाडे परिचय यांनी केला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या श्रीमती झिमरे यांनी कन्याशाळेच्या स्थापनेपासून म्हणजे 1925 सालापासून ते आजपर्यंत म्हणजे 2018 पर्यंतच्या शाळेच्या प्रगतीचे टप्पे उलगडून दाखविले. संस्था प्रतिनिधी सौ. स्वाती शेंडे यांनी महर्षी कर्वे, बाया कर्वे यांची कन्याशाळा सुरू करण्यामागची भूमिका विषद करून सांगितली. तसेच संस्थेत शिकत असलेल्या हजारो गरीब विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी उपयुक्‍त ठरलेल्या भाऊबीज निधीत दात्यांनी भरघोस मदत करावी, असे आवाहन सौ. शेंडे यांनी केले. या कार्यक्रमातच बाया कर्वे, भाऊबीज निधी, यावर तयार केलेल्या स्फूर्तीपाक्षिकांचे तसेच वाचू आनंदे – लिहू आनंदे, महिला उद्योजिका, विज्ञाननगरी, यासारख्या हस्तलिखितांचे प्रकाशन झाले.

स्नेहसंमेलनाचे निमित्त साधून श्रीमती भारती झिमरे यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरविण्यात आले. चांगदेव इंगळे यांना आदर्श सेवक म्हणून तर तेजल पेटकर या विद्यार्थिनीला आदर्श विद्यार्थिनी म्हणून सन्मानित करण्यात आले.
या स्नेहसंमेलनात हस्तकला, शिवण, विज्ञान क्रीडा, कला आदी विषयांवरची प्रदर्षने भरवली होती. सौ. संध्या पानसे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ. नीतादेवी गोंजारी यांनी आभार मांडले. ऍड. प्रभाकर सोनपाटकी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सर्वोत्तम कार्यक्रम सादर केल्याबद्‌दल विद्यार्थिनी व शिक्षकांचे कौतुक केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)