ध्येय निश्‍चित केल्यास यश शक्‍य

मंचर -विद्यार्थ्यांनी जिद्द व सचोटी कायम ठेवल्यास आत्मविश्‍वास वाढेल आणि ध्येय निश्‍चित केलेल्या ठिकाणी आपण पोहचू त्यासाठी जिद्द बाळगावी, असे आवाहन स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले.
दत्तात्रयनगर-पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर शिक्षण संस्था संचलित स्व. दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन झाले, यावेळी झालेल्या कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते.

कार्यक्रम प्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, बाळासाहेब घुले, बाबासाहेब खालकर, माऊली गावडे, शांताराम हिंगे, माऊली अस्वारे, अण्णासाहेब पडवळ, उत्तम थोरात, भगवान बोऱ्हाडे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर बोऱ्हाडे, उपाध्यक्ष नाथा घेवडे, संचालक अनिल वाळुंज, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, मुख्य लेखापाल राजेश वाकचौरे, कार्यालयीन अधीक्षक रामनाथ हिंगे, शिक्षण संस्थेचे कार्यालयीन सचिव वसंत जाधव उपस्थित होते.
दिलीप वळसे पाटील म्हणाले की, विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन जीवन हे आनंदाने हसणे, बागडण्याचे तसेच स्वछंदी जीवनाचा आनंद घेण्याचे असते. मात्र, हे सर्व करत असताना अभ्यास करून आपल्या पालकांचे समाधान करावे. याच वयात आपले ध्येय निश्‍चित केल्यास यश दूर नाही.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक बी. डी. चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पडवळ तर प्राचार्य डॉ. शरद आवारी यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)