ध्येय गाठण्यासाठी यशाची चिंता करू नका 

पुणे – नावीन्य आणि संशोधनवृत्ती असेल तरच स्पर्धेत टिकू शकाल. ध्येय गाठण्यासाठी यशाची चिंता करू नका कर्तव्य पार पाडत राहा, असा सल्ला केंद्रिय कृषी संशोधन व प्रशिक्षण विभागाचे सचिव डॉ. त्रिलोचन महापात्रा यांनी विद्यार्थ्यांना दिला. वैकुठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थानच्या पदव्युत्तर व्यवस्थापन कृषी व्यवसाय प्रबोधन अभ्यासक्रमाच्या दिक्षांत समारंभात ते बोलत होते.

यावेळी केंद्रिय कृषी सहकार विभागाच्या अप्पर सचिव उपमा श्रीवास्तव, डॉ. के. के. त्रिपाठी, एस. वाय. देशपांडे, मोहन मिश्रा उपस्थित होते. डॉ. महापात्रा म्हणाले, दरमहा वेतन मिळविणे म्हणजे नोकरी नव्हे, कृषी क्षेत्रात ती एक जबाबदारी असते शेतकरी देशाची आर्थिक स्थिती समाज आणि मानवता यांची सेवा म्हणजेच नोकरी होय अलीकडच्या काळात त्यागाची वृत्ती कमी झाली आहे. जीवनाच्या मुल्यांचा विसर पडला आहे. यामुळे नोकरी करताना काम करणे म्हणजे डोक्‍यावर खूप मोठे ओझे असल्यासारखे अनेक जण वागतात. ही वृत्ती सोडून त्याग सेवेच्या भावनेतून नोकरी करणे अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)