ध्यान, गाण व ज्ञान जीवनातील मुख्य सूत्र

श्री श्री रविशंकर : बालेवाडीत अध्यात्मिक महासत्संग

पिंपरी – माणसाची बुद्धी व्यवस्थित राहिल्यास समाज जागृत राहील. तसेच, ध्यान, गाण व ज्ञान जीवनातील मुख्य सूत्र आहेत. समाजातील वातावरण नेहमी सकारात्मक ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री श्री रविशंकर यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्ट ऑफ लिव्हिंग संघ पुणे व आर्ट ऑफ लिव्हिंग वैदिक धर्म संस्थान यांच्यातर्फे बालेवाडी मैदानावर श्री श्री रवीशंकर यांच्या अध्यात्मिक महासत्संगचे आयोजन केले होते. यावेळी, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या सदस्यांनी विश्‍व कल्याणासाठी व उत्कर्षासाठी संकल्प केला. कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.

श्री श्री रवीशंकर म्हणाले, “भजन गीतं हे प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. समाजातील प्रत्येकाने अभिव्यक्त तसेच अभिव्यक्ती झाले पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक गावात अध्यात्म जपले जात आहे. या पृथ्वीतलावर अशिक्षित व सुशिक्षित लोक ही अध्यात्माकडे जात असल्याने त्याची ताकत अफाट आहे. या जगात जलस्नानापेक्षा मंत्रस्नान श्रेष्ठ आहे. या देशातील तरुणांनी भारतात शिक्षण घेऊन देशाची सेवा केली पाहिजे. सर्व शक्तिमध्ये भक्तीची शक्ती श्रेष्ठ आहे. प्रत्येकाने भजन गायल्यास सकारात्मक ऊर्जा मिळेल. ध्यानसाधनेमुळे आपण दुःख, राग, बेचैनी, यामधून बाहेर येऊ शकतो आणि आपली संकल्पपूर्ती होते. त्यामुळे दिवसभरातून थोडा वेळ का होईना, ध्यान साधना करणे गरजेचे आहे. अध्यात्मिक ताकत माणसाला ऊर्जा देते. माणसाने जीवनाला अध्यात्माची जोड दिली पाहिजे. समाजातील अनेकजण अध्यात्माकडे वळत असून ही बाब निश्‍चितपणे चांगली आहे. गट-तट जाती धर्म विसरून एकत्र आले तरच आपली समृद्धी आणि विकास होईल,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या सत्संगप्रसंगी भजनाच्या कार्यक्रमाने भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)