धोलवड रस्त्यावर डंपरच्या धडकेत दुचाकीस्वारचा मृत्यू

ओतूर- ओतूर-धोलवड रस्त्यावर डंपरच्या धडकेत एका दुचाकीस्वारचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेबारा वाजता घडला. अक्षय शरद तुळवे (वय 24, राहणार धोलवड, ता.जुन्नर) असे अपघातातील मयत युवकाचे नाव आहे. तर, या अपघातात प्रकाश विकास नलावडे हा जखमी झाला. याबाबत ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बी. डी. मोहरे यांनी सांगितले की, शुक्रवारी अक्षय तुळवे हा (एमएच 14 एक्‍यू 3524) वरून धोलवडवरून ओतूरला जात असताना ओतूरहुन ओझरकडे येणाऱ्या डंपर (एमएच 26 बी 4679) ने समोरासमोर धडक दिली. यात अक्षय तुळवे हा गंभीर जखमी होऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ओतूर पोलिसांनी डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)