धोलवडला भजन साहित्य वाटप

ओतूर- धोलवड (ता. जुन्नर) येथे पुणे जिल्हा परिषदेअंतर्गत पंचायत विभागद्वार धोलवड येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले आणि यांच्या हस्तेकाकडा भजन कार्यक्रमात भजन साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यांच्यासमवेत जुन्नर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्याध्यक्ष तुषार थोरात उपस्थित होते. यावेळी काकडा भजनावेळी गावकऱ्यांशी बोलताना ढमाले यांनी सांगितले की, वारकरी आणि महिलांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करत राहणार असून, आपण सर्वांनी पुढाकार घेऊन या योजनेचा फायदा घ्यावा, सध्या 1 डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषदेची महिला आणि बालकल्याण विभागाची महिला घरकुल दुरुस्ती योजना चालू असून, या योजनेचा लाभ लाभार्थींनी घ्यावा, असे उपस्थितांना अवाहन केले. याप्रसंगी नरेंद्र नलावडे, शांताराम ओझरकर, दत्ता नलावडे, सचिन नलावडे, ऋतुराज नलावडे, तुषार नलावडे, मिलिंद नलावडे आणि काकडा भजन मंडळाच्या बहुसंख्य महिला आणि परिसरातील वारकरी भाविक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)