धोम धरणाची सुरक्षा रामभरोसे

मेणवली ःसुरक्षा रक्षकच नसल्याने रिकामे असलेले शासकीय निवासस्थान.

सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याची मागणी
मेणवली, दि. 20 (वार्ताहर) – मुसळधार पावसामुळे तुडुंब भरलेले धोम धरण पहाण्याचा आनंद लुटण्यासाठी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वाई तालुक्यातील पर्यटका बरोबर बाहेरच्या गावातील पर्यटक ही गर्दी करत आहेत. गर्दीवर नियंत्रण न राहिल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. धरणाच्या उत्तरेकडील बाजूस कुठलीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे धोम धरणाची सुरक्षा रामभरोसे झाली आहे.
धोमधरण भिंतीची लांबी 2700 मीटर असून भिंतीची दोन्ही टोक पश्चिम भागाच्या जांभळी व जोर रस्त्याला जोडली गेली आहे. जोर रस्त्यावर बोरीव हद्दीत धरणाचे मुख्य प्रवेशद्वार असून येथूनच धरणातील पाणी नदीला व कालव्यात सोडण्यात येत असल्याने याठिकाणी पाटबंधार्‍यांच्या विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. परंतु उत्तरेकडील धोम गावच्या बाजूस जांभळी रस्त्या वरील दुसर्‍या गेटवर कसलीही साधी सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नसल्याने या बाजूला कधीही मोठी दुर्घटना अगर गैरप्रकार घडून शकतात.
याठिकाणी नावापूरताच दरवाजा असल्याने दिवसा व रात्री उशिरापर्यंत धरण परिसरासह मुख्य भिंतीवरच प्रेमी युगालासह अट्टल दारुड्यांचा खुलेआम मनमानी धिंगाणा सुरू असतो. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी तरर्र झालेल्या मित्रांच्या पार्टीत एकाला आपला जीव गमवावा लागला होता याचे कसलेही सोयरसुतक पाटबंधारे
विभागाला नाही. या परिसरात मुंबई, पुणे व अन्य ठिकाणच्या गाड्या मधून कोण येत कोण जात याची तपासणी केली जात नाही.या सगळ्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने धोम धरण उत्तरेकडे तात्काळ सुरक्षा रक्षकाची व्यवस्था करण्याची मागणी जनतेतून करण्यात येत आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)