धोबी, लॉंड्री व्यवसायासाठी विजेचे नवीन दर 

मुंबई: धोबी व लॉंड्रीचा व्यवसायाकरिता वीजेचे दर कमी करावे, या धोबी, परिट समाजाची अनेक वर्षांच्या मागणीची दखल घेत उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दिलासा दिला आहे. 1 सप्टेंबर 2018पासून त्यांना प्रती युनिट रु. 6.06 असा नवीन दर लागू करण्यात आला आहे. तसेच जे घरी लॉण्ड्रीचा व्यवसाय करतात त्यांना घरगुती वीजेप्रमाणे दर आकारले जातील.
वाणिज्यिक दराऐवजी वाणिज्यिक दरापेक्षा कमी दर आकाराण्याकरिता धोबी, परिट समाजाची अनेक वर्षापासून मागणी होती. ही मागणी विचारात घेऊन महावितरण कंपनीमार्फत महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल मध्यम पुनर्विचार याचिकावर आयोगाने नुकतेच आदेश दिले आहेत. या आदेशानुसार धोबी-लॉंड्रीकरिता नवीन वर्गवारी लघूदाब (औद्योगिक -सर्वसामान्य ) अशी केली आहे. त्यानुसार 1 सप्टेंबर 2018 पासून त्यांना प्रती युनिट रु. 6.06 असा नवीन दर लागू करण्यात आला आहे. यापूर्वी त्यांना वाणिज्यिक दराने म्हणजेच 0 ते 200 युनिट करिता रु 7.28 प्रती युनिट व 200 पेक्षा अधिक युनिट करिता रु. 10.5 प्रती युनिट दराने आकारणी करण्यात येत होती.
तसेच जे लॉंड्री व्यवसाय त्यांच्या राहत्या ठिकाणी करतात त्यांना मात्र घरगुती वीजदर लागू करण्यात आले आहेत. घरगुती विजेचे दर 0 ते 100 युनिट करिता रु. 4.30 युनिट व 101 ते 300 युनिट करिता रु. प्रती युनिट असे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)