धोनी हा आमचा प्रमुख मार्गदर्शक – रोहित शर्मा

विश्‍वचषकाच्या वेळी तो संघात असणे महत्वाचे

सिडनी: महेंद्रसिंग धोनी हा भारतीय संघाचा प्रमुख मार्गदर्शक असून विश्‍वचषकामध्ये भारतीय संघासाठी धोनी हा मोलाची भूमिका पार पाडू शकतो त्यामुळे त्याचे संघात असणे हे महत्वाचे असल्याचे विधान भारतीय एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फलंदाजीच्या बळावर सामना जिंकून देण्याच्या धोनीच्या क्षमतेवर गेल्या काही महिन्यांत प्रश्नचिन्ह उभे राहिले असले तरी रोहितच्या मनात मात्र त्याबाबत अजिबात शंका नाहीये. अत्यंत कठीण परिस्थितीतही शांत व संयमी राहण्याचा धोनीचा स्वभाव जास्त मोलाचा व उपयुक्त असल्याचे रोहितचे म्हणणे आहे. कर्णधारपद सोडल्यानंतरही धोनीची कामगिरी चांगली राहिली असून नवीन खेळाडूंना घडवण्यात त्याचे मोलाचे योगदान राहिले असल्याचे रोहितने यावेळी नमूद केले असून गेल्या काही महिन्यांमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या खालावत चाललेल्या कामगिरीवरून संघामधिल त्याच्या निवडी बाबद उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने त्याची बाजु मांडली आहे.

यावेळी बोलताना रोहित म्हणाला की, सामना जिंकण्यासाठी धोनीचे कौशल्य तर उपयोगात येतेच परंतु त्याचे केवळ मैदानावर असणेही प्रेरणादायी असते व धोनी स्टम्पमागे आहे हे कर्णधारासाठीही आश्वासक असते असेही रोहितने यावेळी म्हटले आहे. भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून अनेक वर्षे धोनीने मैदान गाजवले असल्यानं तो आजही आमचा मार्गदर्शक असल्याचे उद्गार रोहितने यावेळी काढले आहेत.

भारताला एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचायची संधी

ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ एकदिवसीय मालिकेत यजमान ऑस्ट्रेलियाला दणका देण्यासाठी सज्ज झाला आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची वन डे मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने दोन्ही मालिकेतील आठही सामने जिंकल्यास त्यांना आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाजवळ पोहोचता येऊ शकेल. सध्या इंग्लंड 126 गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि आठही सामने जिंकल्यास भारताची गुणसंख्या 125 होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)