धोनी आणि निकच्या टीममध्ये चॅरिटीसाठी फुटबॉल मॅच 

बॉलिवूड आणि क्रिकेटचे कनेक्‍शन तसे जुने आहे. मात्र हे दोन्ही फुटबॉलच्या मैदानात एकत्र आल्याचे दृश्‍य रविवारी बघायला मिळाले. महेंद्र सिंह धोनी आणि प्रियांका चोप्राचा मित्र निक जोनास यांच्या टीममध्ये नुकताच एक चॅरिटी फुटबॉल सामना खेळला गेला. बांद्राच्या फुटबॉल कॉम्प्लेक्‍सच्या ग्राऊंडवर झालेल्या या सामन्यामध्ये निक जोनासला प्रोत्साहन देण्यासाठी प्रियांका चोप्राही आली होती. या प्रेक्षणीय मॅचमध्ये ईशान खट्टर आणि आदित्य रॉय कपूर देखील सहभागी झाले होते. फुटबॉल खेळता खेळता निक धडपडला आणि थोडा जखमीही झाला.
मात्र तरिही त्याने खेळणे सुरूच ठेवले आणि त्याने एक गोल देखील केला. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये धोनीच्या टीमने 5 विरुद्ध 4 असा विजय मिळवला. धोनी क्रिकेट खेळण्यापूर्वी आपल्या स्कूलकडून फुटबॉलचा गोलकीपर म्हणूनच खेळत असायचा. त्या अनुभवाचा फायदा त्याला झाला. प्रियांकाच्या मित्राला सपोर्ट करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक स्टार यावेळी उपस्थित होते. त्यात ईशान खट्टर सर्वात युवा कलाकार होता. “धडक’ रिलीज झाल्यापासून तो अन्य कोणत्याही प्रोजेक्‍टमध्ये सध्या तरी काम करत नाही आहे. तर धोनीला सपोर्ट करायला त्याची पत्नी साक्षीही आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)