धोनीने स्थानिक सामने खेळावे – मोहिंदर अमरनाथ

नवी दिल्ली: महेंद्रसिंग धोनी व शिखर धवनने स्थानिक क्रिकेट खेळले पाहिजे, असे आवाहन मध्यंतरी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी केल्यानंतर आता त्यांच्या सुरात सूर मिसळून माजी कसोटीपटू मोहिंदर अमरनाथ यांनीही धोनी व संघातील इतर ज्येष्ठ खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट खेळून संघनिवडीसाठी आपला दावा पक्का करायला हवा असे विधान केले आहे.

मोहिंदर अमरनाथ यावेळी बोलताना म्हणाले की, जर तुम्हाला भारतीय संघात खेळायचे आहे तर तुम्ही तुमच्या राज्याचे प्रतिनिधित्वही केले पाहिजे. पण सध्या बीसीसीआयने हा नियमच बदलून टाकलेला दिसतो. अनेक वरिष्ठ खेळाडू स्थानिक क्रिकेटला बगल देतात. मोहिंदर पुढे म्हणाले की, एखाद्या खेळाडूने जे काही केलेले आहे तो सगळा भूतकाळ आहे. सध्या तो कसा खेळतो हे महत्त्वाचे. त्यामुळे बीसीसीआयने संघात येण्यासाठी काही पात्रता निकष तयार करायला हवेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)