धोनीनंतर आता विराट कोहलीचा नवा लूक समोर

नवी दिल्ली : प्रत्येक आयपीएलमध्ये नामांकित खेळाडू आपल्या हेअरस्टाईलमुळे नेहमी चर्चेत येतात. चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नुकतेच त्याच्या हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला होता, आता धोनीच्या नंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार विराट कोहली यामध्ये मागे नाही. या आयपीएलच्या मोसमासाठी कोहलीने खास हेअरस्टाईल केली आहे. ही हेअरस्टाईल करतानाचा फोटो त्याने सोशल मिडीयावर पोस्ट केला आणि एका तासात लाखो चाहत्यांनी त्याला पसंती दिली आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यानंतर कोहलीने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे श्रीलंकेत झालेल्या निदाहास ट्रॉफीमध्ये तो खेळला नव्हता. आयपीएलला 7 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोहलीने विश्रांती घेतली होती. या कालावधीमध्ये कोहलीने आपली नवीन हेअरस्टाईल केली आहे.

कोहलीने स्टाइल मास्टर असलेल्या आलिम हकीमकडून ही नवीन हेअरस्टाईल करून घेतली आहे. आपल्या या नवीन हेअरस्टाईलचा फोटो कोहलीने इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर इंस्टाग्रामवर एका तासामध्ये तब्बल सहा लाख चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. बंगळुरुच्या संघाला आतापर्यंत आयपीएलमध्ये एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. 2009, 2011 आणि 2016 या मोसमांमध्ये बंगळुरुला उपविजेतेपद मिळाले होते. बंगळुरुच्या संघात कोहलीसह दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी’ व्हिलियर्स हा धडाकेबाज फलंदाज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)