धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही – सेहवाग 

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर सापडलेल्या महेंद्रसिंग धोनीचे कौतुक केले आहे. सध्याच्या घडीला भारतीय संघात धोनीची जागा कोणीच घेऊ शकत नाही. धोनीला पर्याय 2019 च्या विश्‍वचषकानंतरच शोधावा लागेल, असेही सेहवाग याने म्हटले आहे.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये वीरेंद्र सेहवाग याने धोनीविषयी भाष्य केले. सध्या भारतीय संघात कोणीही धोनीची जागा घेऊ शकत नाही. ऋषभ पंत हा चांगला खेळाडू आहे. पण धोनीची जागा घेण्यासाठी त्याला वेळ लागेल. 2019 च्या विश्‍वचषकानंतरच आपण धोनीसाठी पर्याय शोधला पाहिजे. ऋषभ पंतला तोपर्यंत अनुभवही येईल, असे सेहवाग याने सांगितले. धोनीसारखा संघात मधल्या आणि खालच्या फळीत खेळण्याचा अनुभव कोणत्याही फलंदाजाकडे सध्याच्या घडीला नाही. आता धोनी 2019 च्या विश्‍वचषकापर्यंत फिट राहू दे, अशी प्रार्थना आपण केली पाहिजे, असेही त्याने नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)