धोका… (भाग ६)

सोशल मीडियाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोक फसवले गेल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात, अशा वेळी नेमकी कशी काळजी घावी याबद्दल या कथेद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. 

कथेचे या आधीचे भाग वाचण्यासाठी क्लिक करा :

धोका… (भाग १)

धोका… (भाग २)

धोका… (भाग ३)

धोका… (भाग ४)

धोका… (भाग ५)

” बेटा अजुन तू त्याला पाहीले नाहीस, भेटली नाहीस… तो इथे आला अन त्याच्या बाबतीत हे सर्व घडतय. मला काही हे योग्य वाटत नाही, की तू ज्या माणसाला आजपर्यत भेटली नाहीस त्याच्यावर इतका जिव. थोडीशी शहाणी हो, त्याला येऊ दे..  मग ठरव कधीही सत्य जाणल्याशिवाय इतके आगतीक होवु नये.” अभिनयरावानी पुजाला सत्य समजावण्याचा प्रयत्न केला. पुजा काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचा प्रियकर तिकडे हॉस्पिटलमध्ये खितपत पडलाय त्याचे घरच्याना काहीच नाही. हा विचार पुजाच्या मनात डोकावत होता. इतक्‍यात पुजाच्या मोबाईलची रिंग वाजली पुजा पळत रूम मध्ये मोबाईल घ्यायला गेली. मागोमाग तिचे आई वडिलही गेले. बहुदा हा कॉल रजतचा असावा असा सगळयाचांच अंदाज होता.
“”हॅलो पुजा रजत बोलतोय.” रजतचाच कॉल होता. सगळयांचा अंदाज खरा ठरला.
“”हां रजत कसा आहेस? तुझा पाय कसा आहे? ऑपरेशन झाले का? डॉक्‍टर काय म्हणाले? तु कधी येणार आहेस? आई-बाबांना तुला भेटायचंय?” एका दमात पुजाने इतके सारे प्रश्‍न विचारले की, तिकडे रजतला काय बोलायचे सुचेनासे झाले.
“”अगं हो! लवकरच येतोय सांग आई-बाबांना. त्यांना बोलली नाहीस ना. माझ्या ऍक्‍सिडेंट बाबत… त्यांना उगीच त्रास देऊ नकोस.”
“”हं” पुजा रजतचे शब्दनं शब्द मनात ठेवत होती.
“”पुजा, त्या कस्टम वाल्यानी माझे कार्डस वगैरे सर्व ठेवुन घेतलेत. खिशात थोडेफार होते ते ऍडमिट होतानाच संपले. काल रात्रीच तुला सांगणार होतो पण…”
“”अरे मी काय परकी आहे काय? सांगायच होतंस रात्रीच. किती पैसे लागणार आहेत?” पुजाने विचारले. रजतसाठी इतके करेना ती पुजा कसली?
“”दोन लाख लागतील, हॉस्पिटलचे बिल वगैरे सर्व मिळुन” रजतने किती पैसे लागणार आहेत ते सांगीतले.
“”दोन लाख! इतके?” पुजाने आश्‍चर्याने विचारले.
“”बेब्‌स माझ्यावर विश्‍वास नाही काय? सांग तुला तसे फ्रॉड वगैरे वाटते का?” रजतचा हा प्रश्‍न पुजाच्या टोचला.
“”तसे नाही रे माझ्या कडे इतके नाहीत. त्यामुळे माझ्या तोंडुन असे शब्द निघाले. अन हो तुझ्या इतका विश्‍वास मी कधीच कुणावर ठेवला नाही. ठिक आहे मी पाहते काही तरी” पुजा पैशाची कशी जुळवाजुळव करायची तो विचार करीत होती.
“”बघ तुला किती जमताहेत ते? मी माझा बॅक अकाऊंट नंबर पाठवितो. प्लिज ट्राय कर.”
पुजा विचारात पडली की आता कसे करायचे. आई बाबा मागेच होते.
“” पुजा काय झाले गं ? काय अडचण?” बाबांनी पुजाला विचारले.
“” बाबा रजतला दोन लाख रूपये लागणार आहेत. हॉस्पिटलचे बिल वगैरे करीता. अन माझ्याकडे एकच आहेत. तुम्ही देता का मला राहीलेले?” पुजानी बाबांना जे  काय आहे ते सांगुन रजतकरीता पैशांची मागणी केली.
अभिनयरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्या मनाने काहितरी वेगळे घडत असल्याचे ताडले. “” पुजा, रजत तुला फसवत तर नाहीना? मला माझे मन सांगतेय. त्याला विचार कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहेस? बाबांचे मित्र आहेत ते पैसे घेवुन येतील असे सांग.”
” बाबा माझ्याप्रेमावर अविश्‍वास. मला हे आवडले नाही. नसतील दयायचे तर तसे सांगा…  पण रजत बद्दल काही बोलायचे नाही.” पुजाने बाबांना सुनावले. होय तिचे रजतवर होतेच तसे प्रेम. त्यामुळे बाबांनी रजतला बोललेले तिला सहन झाले नाही.
“” मी देतो पण त्याला विचार तरी. हे बघ तू त्याला अजुन पाहीले नाहीस भेटली नाहीस अन त्याच्यावर इतके प्रेम. बेटा वडिल म्हणुन सांगतोय काळजी वाटतेय गं” बाबांनी पुजाला सांगीतले. पुजा काहीएक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचे प्रेम पुर्णता खरे होते त्याकरीता तिने वडीलांचेही काहीही न ऐकण्याचे ठरवले होते.
“” काही गरज नाही मी पाहते काय करायचे ते, प्लिज तुम्ही काही करू नका.” पुजाने बाबांना सांगीतले. बाबा विचार करत बाहेर पडले.
पुजाने रजतला मॅसेज केला “अकांऊट नंबर सेंड कर. मी सध्या एक लाख पाठविते व नंतर थोडेफार पाठविते.”
रजतने अकाऊंट नंबर पाठवताच पुजाने त्याला ऑनलाईन पैसे पाठवुन. परत मॅसेज केला “” पैसे पाठवले आहेत, तु कलेक्‍ट करून फ्री झालास की कॉल कर.”
“” ओके बेब्‌स, थॅक्‍स आलेत पैसे” रजतने रिप्लाय दिला.
सांयकाळ 7 वाजले तरी रजतचा ना कसला मॅसेज आला ना कॉल. वाट पाहुन पुजाने रजतला कॉल लावला.  पण त्याने कॉल रिसीव्ह केला नाही. ती कॉलवर कॉल, मॅसेजवर मॅसेज करीत होती तरीदेखिल रजत कडुन कसलाच रिप्लाय येत नव्हता. पुजाचा धीर तुटत चालला होता. रजतला काही झाले की काय? तो फोन का नाही उचलत? बाबा बोलले तसे तर नाही ना? मनात विचारांचा कल्लोळ माजला, काही झाले तरी बाबा तिचे खुप चांगले मित्र असल्याने तिने बाबांशी बोलण्याचा निर्णय घेतला. खोलीतुन बाहेर आली तर समोरच सोफ्यावर आई बाबा बसले होते. बाबा जवळ बसत पुजा बोलली.
“” बाबा रजत फोन उचलत नाही. मॅसेजला रिप्लाय देत नाही. मला काळजी वाटतेय.”
“” बेटा मला तर त्याच्याविषयी शंका वाटतेय.”
“” काहीही तुमचे”
“” ठिक आहे फक्‍त एकदा सत्यता पाहुयात आपण.  जर असेल सत्यता तर सर्व तुझ्या सांगण्याप्रमाणे होईल मी ही मदत करतो तुला ओके.”
पुजाच्या मनातील गोंधळ तिला सावरू देत नव्हता त्यात बांबाच्या या वाक्‍याने पुरती गोंधळून जाउन रजतची सत्यता पाहण्यास होकार ही दिला.
पुजाने रजतला कॉल केला “हॅलो रजत तु ताबडतोब पुण्याला ये. मला तुझ्याशी बोलायचेय”
“” हूं येतो, असे काय झाले की तु मला ताबडतोब बोलवतेस?” रजतने पुजाला विचारले.
“” बाबांना तुला भेटायचेय, मी बाबांना आपल्या बददल सर्व सांगीतलेय. ये तू”
“” बरं ठिक आहे येतो मी दोन दिवसात.” इतके बोलुन रजतने फोन कट केला.
पुजाला थोडा धीर आला. तिला रजतशी अजुन बोलायचे होते म्हणुन परत कॉल केला. तर रजतने कट केला. ती परत कॉल करू लागली, तरी देखील रजत कट करीत होता. मला बोलायचंय असा मॅसेज केला तरी काही एक रिप्लाय नाही. थोडा वेळ वाट पाहुन तिने परत कॉल केला तेव्हा रजतचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. खुपदा प्रयत्न करूनही तेच, तिने तिचे फेसबुक अकाऊंट ओपन केले व रजतचे प्रोफाईल पाहु लागली.  तर तेही फेसबुक वर दिसत नव्हते. या साऱ्या प्रकारामुळे तिच्या पायाखालची वाळु सरकली. बाबा सारे काही पाहत होते त्यांना आपल्या मुलीची फसवणुक झाल्याचे ध्यानात आले. पुजाच्या डोळयांतुन आपोआप पाणी वाहु लागले.
पुजाने व तिच्या बाबांनी पोलीस स्टेशन गाठले. झाला प्रकार पोलीसानां सांगीतला.  असे बरेचशे प्रकार पोलिसांना माहीत असल्याने त्यांनी तिला समजावुन सांगीतले. तक्रार दाखल करून घेतली व रजतचा शोध घेण्यास सुरवात केली.
अशा कितीतरी पुजा आज दररोज फसताहेत. फेसबुकच्या मायावी जगात प्रत्येकजण खराखुरा व्यक्‍ती नसतो. आपली ओळख लपवुन फेसबुकच्या जगात वावरणारे खुप जण आहेत.  तेव्हा आपल्या परीचयाचा असेल तरच फेसबुक रीक्वेस्ट एक्‍सेप्ट करा.
मुलांचे पालक या नात्याने मुलांच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. पाल्याशी विश्‍वासाचे नाते ठेवुन त्यांच्या फेसबुक मित्रा बददल जाणुन घ्या…. (समाप्त)

– मंगेश देसाई 
(लेखक सध्या कळे पोलीस स्टेशन, जि. कोल्हापूर येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर सायबर सेल साठी काम केले आहे. 
वरील कथेमधील नावं बदललेली आहेत. आजच्या तरुणाईने एकूणच सोशल मीडिया हाताळताना कशा प्रकारे सजग असायला हवे हे लेखकांना या कथेतून मांडायचे आहे.)

( डिस्क्‍लेमर – लेखात व्यक्त झालेली मते ही लेखकाची स्वतःची असून त्याच्याशी दैनिक प्रभात सहमत असेलच असे नाही.)


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)