धोका… (भाग २)

सोशल मीडियाचा गैरफायदा घेऊन सामान्य लोक फसवले गेल्याच्या घटना आपल्या आजूबाजूला घडताना दिसतात, अशा वेळी नेमकी कशी काळजी घावी याबद्दल या कथेद्वारे मार्गदर्शन केले जाणार आहे. याच कथेचा पुढील भाग पुढच्या सोमवारी प्रकाशित होईल.. 

कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी क्लिक करा :

धोका… (भाग १)

” हे… पु! काय हे तु आज एकदम मोबाईल मध्येच घुसली आहेस आल्या आल्या.” रिना ने विचारले.
“हं”
पुजाच्या इतक्‍याशा रिप्लायने हीचा काय बोलायचा मुड दिसत नाही, अन हिला डिवचण्यात काय अर्थ नाही रिना ने ओळखले. दोघी एकमेकीना बऱ्याच दिवसापासुन ओळखत असल्याने स्वभाव चांगलेच माहीत होते. पुजा आपल्याच नादात मॅसेज वाचण्यात मग्न होती. आपण रिप्लाय द्यावा की नको – द्यावा की नको याचेच व्दंव्द तिच्या मनात चालु असतानाच तिने मनाशी पक्‍क करून रिप्लाय मॅसेज टाईप केला.

“” ओह! मीही तुझे प्रोफाईल पाहुनच फ्रेंड रिक्वेस्ट एक्‍सेप्ट केलीय. अन काय योगायोग बघ आपण दोघेही एकाच फिल्ड मध्ये” हा रिप्लाय सेंड करून तिने मान वर केली तर रिना तिच्याकडेच पाहत होती. रिनाने खूणेनेच विचारले काय म्हणुन.
“अग कांही नाही गं एक रजत वशिष्ठ नावाच्या मुलाने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती, ती मी एक्‍सेप्ट केल्यावर त्याचा मॅसेज आला तो पाहत होते.”
“” तुझ्या ओळखीचा आहे का तो ?
” नाही गं, पण त्याचा मॅसेज आला होता अन तोही आयटी मध्ये असुन अमेरिकेत आहे व विशेष म्हणजे पुण्याचा आहे. आणि ही इज सो हॅण्डसम… सो केली ऍक्‍सेप्ट” पुजा ने रिनाला तिला जे वाटले ते स्पष्ट सांगितले. तितक्‍यात त्यांचे ऑफिस आले.
ऑफिसमध्ये मोबाईल वापरण्यावर निर्बंध असल्याने वॉल्ट मध्ये मोबाईल जमा करून जावे लागत असे. पुजाने मोबाईल ठेवणार इतक्‍यात मॅसेज टोन वाजली. पाहते तर रजतचा मॅसेज होता. अगोदरच उशिर झाल्याने नंतर वाचुन रिप्लाय दयावा असे ठरवुन टेबलवर गेली खरी परंतु तिचे काय लक्ष लागेना.  एक दोन कॉल अटेंड करून काय मॅसेज आला ते पहावे असे मनाशी ठरवले व कामास लागली. कसेतरी दोन कॉल अटेंड केले टि-ब्रेक घेवुन मॅसेज पहायला गेली.

मोबाईल हातात घेवुन पाहते तर ” थॅक्‍स” व दोन एक स्माईली होत्या. तिनेही स्माईली पाठवली.
फेसबुक वरून ते दोघे कधी वॉटसऍपवर आले हे त्यांना कळलंच नाही. त्यांचे चॅटींग सुरू झाले. रजतने वॉटसऍप केला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते.
“”हाय”
“”ओ हाय” पुजाने रिप्लाय केला.
“” कशी आहेस”
“”छान आहे, तुला मिस करतेय.”
“”हो!”
“”कोई शक”
“”अगं तसं नाही सहज विचारले, गम्मत म्हणुन. मी पण तुला मिस करतोय.”
“”शोना कसले हे आपले प्रेम? मी कधी कधी विचार करते, तू तिकडे मी इकडे अन आपले हे फेसबुक वरचे व्हर्च्युअल प्रेम.”
“”हो ना”
“”तुझी रिक्वेस्ट येते काय, आपण बोलतो काय, अन कधी एकमेकांचे होतो काय हे समजलंही.
“”मी ही विचार करतो कि, तु माझी रिक्वेस्ट कशी काय ऍक्‍सेप्ट केलीस. ना ओळख ना पाळख पण तुझा प्रोफाईल पाहीला अन तूला रिक्वेस्ट पाठविली. थोडी धडधड वाटत होती कि तू ऍक्‍सेप्ट करशील की नाही.”
“”किती वेळेस तेच तेच सांगशील रे”
“”काय करू अजुन मला विश्‍वासच वाटत नाही. असो अजुन काही.”
“”तू बोल”
“”लव्ह यू”
“”वाटलंच होतं! तू पण ना.. मी टू”
“”काय करतेयस आता?”
“”काही नाही लोळत पडलेय तूझ्याशी चॅट करत.”
“”हो”
“”होहोहोहोहोहो”
“”एक विचारू”
“”हूं”
“”जावुदे”
“”प्लिज बोलना काय”
“”आय हेट यू”
“”हे बोलायचे होते हं”
“”नाही”
“”मग”
“”विल यु मॅरी मी”
“”आय हेट यु”
“”का? आता काय केले मी?”
“”काही नाही, हं”
“”म्हणजे काय नाही समजु का?”
“”पागल! हो”
“थँक्स”
अशा या फेसबुकच्या मैत्रीला प्रेमाचे अंकुर फुटत होते. त्यांनतर चॅटिंग अन कॉलिंग सतत सुरू राहीले. तासनतास बोलण्यात गप्पा मारण्यात जात होते. दोघेही एकमेकां बददल जाणुन घेत होते सुख दु:खाची देवाणघेवाण करत होते. दिवस कसे सरले हे दोघानांही कळले नाही. प्रत्येक दिवसा गणिक नात्यांची सिमा बदलत होती. आता दोघांनाही दुरावा नकोसा झाला होता. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. पुजाने तर रजत सोबतची खुप सारी स्वप्ने बघितली होती. दोघेही एकमेकांना भेटण्यास. त्यातच रजतने लवकरच भारतात येणार असल्याचे सांगितल्याने पुजा हवेत होती. (क्रमशः)

– मंगेश देसाई 
(लेखक सध्या कळे पोलीस स्टेशन, जि. कोल्हापूर येथे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असून यापूर्वी त्यांनी कोल्हापूर सायबर सेल साठी काम केले आहे. 
वरील कथेमधील नावं बदललेली आहेत. आजच्या तरुणाईने एकूणच सोशल मीडिया हाताळताना कशा प्रकारे सजग असायला हवे हे लेखकांना या कथेतून मांडायचे आहे.)

( डिस्क्‍लेमर – लेखात व्यक्त झालेली मते ही लेखकाची स्वतःची असून त्याच्याशी दैनिक प्रभात सहमत असेलच असे नाही.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)