धोकादायक रस्त्यावर “साथ’कडून रिफ्लेक्‍टर

लोणंद – लोणंद-निरा रोडवरील पाडेगाव हद्दीतील धोकादायक ठरत असल्याले टोलनाका शेड दैनिक प्रभात आणि पाडेगाव ग्रामस्थ यांच्या पाठपुराव्यामुळे काढुन टाकण्यात आले. परंतु शेडचा अर्धवट अवस्थेतील पाया / दुभाजक धोकादायक स्थितीत उभे असल्याने व रात्रीच्या वेळी ते दिसत अथवा लवकर समजून येत नसल्याने मोठा अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते, तसेच वाहनांचे नुकसानही होऊ शकते.

यामुळे साथ प्रतिष्ठान या सामाजिक संघटनेच्यावतीने येथील दुभाजक तसेच कठडे रात्री अपरात्री दिसावे यासाठी आवश्‍यक त्या ठिकाणी रेडियम व रिफ्लेक्‍टर बसविण्यात आले. यासाठी पाडेगावचे सरपंच हरिश्‍चंद्र माने, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युमभाई मुल्ला, रूपेश ढावरे, दीपक बाटे, कृष्णात गुलदगड, नवनाथ चव्हाण यांनी परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)