धोकादायक पुलावरुन साताऱ्यात प्रवेश

सातारा – सातारा शहराचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जात असलेल्या वर्ये पूल, वाढे पूल, संगम माहुली येथील कृष्णा पूल हे वाहतूूक व्यवस्थेची रक्‍तवाहिनी म्हणून ओळखले जातात. ब्रिटिशकालीन पूल असलेल्या मार्गवरुन आजही वाहतूक व्यवस्थेमध्ये फारसा फरक पडला नाही. या पूलावरुन धोकादायक प्रवास सुरु आहे.

व्यापारी व्यवसायाबरोबर विविध महाविद्यालयात शिक्षण घेणारे असंख्य विद्यार्थी साताऱ्यात ये-जा करतात. त्या सर्वाना याच मार्गवरुन प्रवास करावा लागतो.आता हे पूल कालबाह्य झाल्याने ते धोकादायक बनले आहेत. या ठिकाणी पाहणी केली असता कोणत्याच सुरक्षितेच्या उपाययोजना व सूचनाफलक नसल्याने अनेकदा या अरुंद पूलावर प्रवास करताना वाहने नदी पात्रात पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या पुलाचे रुंदीकरण होणे काळची गरज असताना याकडे संबधित विभागाचे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.

वाहतूक व्यवस्था व उपाययोजना यामध्ये दिवसेंदिवस तफावत वाढत आहे. परिणामी अपघातचे प्रमाणात वाढ होत आहे. विशेषतः सातारा जिल्ह्यात रस्ते अपघाताचे प्रमाण अधिक आहे. रस्ते विकास महामंडळने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्‍यक आहे. महामार्गाचे रुंदीकरण सुरु आहे. परंतु उपमार्गाचेही रुंदीकरण होणे आवश्‍यक आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकाना उपमार्गावरील अरुंद रस्ते वेडीवाकडी वळणे वळणावर वाढलेली झाडे झुडपे बरोबरच रस्त्यात पडलेले खड्डे हे अपघाताचे प्रमुख करणे ठरत आहेत.

ऐतिहासिक सातारा शहराला निर्सगाने मुक्‍तपणे उधळण केली आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत या पूलावरुन अधिक वाहतूक होत असते. सुरक्षा कठडे पडलेले आहेत. त्याचबरोबर वळणावर समोरुन येणारे वाहने वाहनचालकाना अनेकदा दिसत नसल्याने अपघात घडत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)