धोकादायक इमारतींकडे नगर पालिकेची डोळेझाक

दुर्घटनेची जबाबदारी घेणार का ?

सातारा : (प्रतिनिधी )
– राजपथावरील धोकादायक इमारतीने तिघांचा बळी घेतला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती प्रतापगंज पेठेत गोरा राम मंदिर परिसरात झाल्याने सातारकरांच्या काळजाचा ठोका चुकला होता . मात्र .
ीव धोक्‍यात घालून वर्षानुवर्षा धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या जुन्या भाडेकरूंचा पुनर्वसनाचा प्रश्न जटील आहे . राजपथावरील तीन वर्षापूर्वी मोडकळीला आलेली इमारत उतरविण्यासाठी पालिकेला आलेला सुमारे हजार रुपये खर्च अडीच वर्षे उलटूनही पालिकेच्या तिजोरीत जमा झालेला नाही. मात्र, या जागेवर मालक मात्र उत्पन्न कमवत आहे. दरम्यान, सातारा शहरात इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. या इमारतींच्या मालकांना नोटीस दिल्या असल्या, तरी बहुतांश इमारती वादाच्या भोवऱ्यात आहेत. सातारा पालिकेत तेरा वकिलांचे पॅनेल काम करते . मात्र जुन्या इमारतींचे न्यायालयीन वाद अद्याप संपलेले नाहीत .पावसाळा आला, की पालिका प्रशासनाला धोकादायक इमारतींची आठवण होते. मग या सर्वांना नोटिस काढल्या जातात. त्यानंतर पालिकेची जबाबदारी संपते, असा अर्थ काढला जातो. सप्टेंबर मधील दुर्घटनेच्या अनुषंगाने राजपथावर, जनता बॅंकेशेजारी, लांजेकर बिल्डिंगबाबत हाच अनुभव आला. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला. दगड- मातीच्या ढिगाऱ्याखाली तिघे गाडले गेले. एक महिलाही गंभीर जखमी झाली होती. या भीषण दुर्घटनेपूर्वी पालिकेने संबंधित इमारतीवर धोकादायक इमारत म्हणून खबरदारीची नोटीस चिटकवली होती. त्याचा पुढे पाठपुरावा झालाच नाही आणि तिघांना हकनाक जीव गमवावे लागले. दुर्घटनेनंतर निर्माण झालेला मातीचा ढिगारा हटविण्यासाठी पालिकेचा सुमारे ……हजार रुपये खर्च आला. गेल्या अडीच वर्षांत हा खर्चही संबंधित मालकाने पालिकेत भरला नसल्याची माहिती पुढे आली आहे. पडलेल्या इमारतीच्या जागेवर सध्या गृहोपयोगी साहित्याचे प्रदर्शन व विक्रीचा मोठा स्टॉल लागला आहे. या स्टॉलला पालिकेची परवानगी नाही. जागा मालकाच्या नावावर पालिकेची थकबाकी आहे. ही थकबाकी व्याजासह वसूल होत नाही, तोवर त्या जागेवर मालकाला कोणीतेही बांधकाम, अगर विकास करता येणार नाही. पालिकेचे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. लांजेकर इमारतीच्या मोकळ्या जागेला सर्रास भाड्याने दिले जाते व फायदा मालकाचा होता मात्र पालिकेला रुपया सुध्दा मिळत नाही .

शहरात आजच्या घडीला इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे पालिका सूत्रांचे म्हणणे आहे. त्यातील काही इमारतींमध्ये काही कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहात आहेत. या जुन्या व धोकादायक इमारती दाट लोकवस्तीत, गजबजलेल्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आर्थिक, तसेच जीवितहानीची भीती आहे. पैकी बहुतांश इमारती मालक- भाडेकरू यांच्यातील वादाच्या भोवऱ्यात आहेत. मालक इमारतीची दुरुस्ती करत नाहीत. काही इमारती उतरवून घेण्याशिवाय पर्याय नाही. मात्र, हक्कावरून घरमालक व भाडेकरू यांच्यावर न्यायालयात खटले दाखल आहेत. जागा सोडल्यास हक्क संपुष्टात येणार असल्याने भाडेकरू धोकादायक स्थितीतही जागा खाली करत नाहीत. या दोघांच्या वादात भविष्यात धोकादायक इमारतीबाबत दुर्घटना घडून त्यातून कोणला इजा झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे.

इमारती जीर्ण का होतात?
भिंतींना पडलेल्या भेगा मोठ्या होत जाणे, बीम वाकणे, वाळवी व पाण्यामुळे इमारतीचे लाकूड खराब होणे आदींकडे दुर्लक्ष धोकादायक ठरते. विविध कारणांमुळे निर्माण होणारा ओलावा इमारतीसाठी अत्यंत धोकादायक असतो. इमारतीतील स्वच्छतागृहालगतच्या भिंतीमध्ये मोठ्या प्रमाणावर ओलावा निर्माण होतो. सांडपाण्याच्या गळक्‍या पाइपमुळेही ओलावा निर्माण होतो. इमारतीच्या खोल्यांत चुकीच्या ठिकाणी जड वस्तू ठेवल्यास इमारतीचा समतोल बिघडतो. इमारतीच्या मूळ संरचनेत आमूलाग्र बदल करून विस्तार केल्याने पायावर अनेक दिशेतून दबाव पडून समतोल बिघडू शकतो, तेच धोकादायक ठरू शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)