देवासमोरील दिव्यामुळे आग लागल्याचा अंदाज
रांजणगाव देशमुख – कोपरगाव तालुक्‍यातील धोडेंवाडी येथील बाळासाहेब माधव नेहे यांच्या प्रविण ट्रेडर्स अँन्ड हार्डवेअर या दुकानाला दि.22 रोजी पहाटे रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत जवळ पास 14 ते 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये पीव्हीसी पाईप, हार्डवेअर मटेरिअल, कलर व इतर साहित्य जळुन खाक झाले आहे. देवासमोर लावलेल्या दिव्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेची माहिती मिळताच तलाठी इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)