धोंडिबा कुंभार यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

पिरंगुट- लवळे (ता. मुळशी) येथील धोंडिबा कुंभार यांना पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शिक्षकदिनी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचा वतीने दरवर्षी या विशेष गुणवंत शिक्षक पुरस्काराचे वितरण केले जाते.
पुणे येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या कार्यक्रमात शिक्षणतज्ज्ञ आणि पत्रकार डॉ. सागर देशपांडे, माजी शिक्षण संचालक दिगंबर देशमुख, माजी शिक्षणाधिकारी प्रकाश परब, उदयसिंह भोसले, शहाजी ढेकणे, मुख्याध्यापक महामंडळाचे राज्याध्यक्ष विजयकुमार गायकवाड, जिल्हाध्यक्ष महेंद्र गणपुले, कार्याध्यक्ष हरिश्‍चंद्र गायकवाड, सचिव नंदकुमार सागर, आदिनाथ थोरात, शांताराम पोखरकर, चंद्रकांत मोहोळ, अरूण थोरात, शिवाजीराव किलकिले, मधुकर नाईक, कुंडलिक मेमाणे आदी उपस्थित होते.
धोंडिबा कुंभार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिवणे (ता. हवेली) येथील नवभारत हायस्कूलमध्ये ज्येष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना यापूर्वी शासनाचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, राज्य शासनाचा सृष्टीमित्र पुरस्कार, आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचा मुळशीरत्न पुरस्कार तसेच अन्य पुररस्कार मिळालेले आहेत.
यानिमित्त मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार केला. यावेळी मुळशी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, तालुकाप्रमुख संतोष मोहोळ, उपजिल्हासंघटीका स्वाती ढमाले, पंचायत समिती सदस्य सचिन साठे, विजय केदारी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राम गायकवाड, उज्वल पाडाळे, मनोज पाडाळे आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)