धूत इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

नगर – गुरुजनांचा आदर करून, देशभक्तीची भावना जागृत ठेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय साध्य करावे. शरीर निरोगी राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते. तसेच मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार करून स्वतःला व इतरांना आनंदित करावे. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य करून स्वतःला उत्तम नागरिक घडवावे असे प्रतिपादन शामसुंदर सारडा यांनी केले.

श्रीरामकृष्ण एज्युकेशन फौंडेशनच्या सेठ नंदलाल धुत इंग्लिश मेडीयम स्कूल व मोहनलाल रामावतार मानधना ज्यु.कॉलेजमध्ये व्या प्रजासत्ताक दिनी अ.नगर मर्चंट कापड संघाचे चेअरमन शामसुंदर सारडा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे बाळासाहेब गांधी, श्रीगोपाल धुत, नंदकुमार झंवर, मोहनलाल मानधना, डॉ.शरद कोलते, राजेश झंवर,नंदलाल मणियार, रविंद्र गुजराथी, बजरंग दरक, सत्यनारायण सारडा, लक्ष्मीकांत झंवर, पुरुषोत्तम पटेल, किरण मणियार, प्राचार्या गीता गिल्डा उपस्थित होते.
गुरुजनांचा आदर करून, देशभक्तीची भावना जागृत ठेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे ध्येय साध्य करावे. शरीर निरोगी राहण्यासाठी जशी व्यायामाची गरज असते तसेच मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक विचार करून स्वतःला व इतरांना आनंदित करावे. शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्य करून स्वतःला उत्तम नागरिक घडवावे असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)