धुळ्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक 

खासदार हिना गावित यांच्या वाहनाची तोडफोड 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात 
धुळे: धुळ्यात आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलनादरम्यान मराठा आंदोलकांनी खासदार हिना गावित यांच्या वाहनाची तोडफोड केली. आंदोलकांचे म्हणणे ऐकण्यास लोकप्रतिनिधींनी नकार दिल्याने आंदोलक संतापले आणि त्यांनी हे हिंसक पाऊल उचलले. आंदोलकांनी गाडीवर चढत गाडीच्या काचेची तोडफोड केली.
धुळ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात आज धुळे, नंदुरबार येथील डीपीडीसीची बैठक होती. या बैठकीसाठी खासदार हीना गावित, आमदार कृणाल पाटील, जयकुमार रावल, सुभाष भामरे, अनिल गोटे आदी उपस्थित होते. बैठक सुरू होण्याआधीपासूनच मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसले होते.
बैठक झाल्यानंतर सर्वप्रथम बाहेर आलेल्या खासदार गावित यांना आंदोलकांनी रोखले. त्यांनी आरक्षणाबाबत चर्चा करण्याची मागणी केली. मात्र गावित यांनी त्यास नकार दिल्याने आंदोलकांनी गावित यांची गाडी फोडली. बाहेरील परिस्थिती चिघळल्याने बैठकीसाठी आलेले आमदार दालनात अडकले आहेत. आंदोलकांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापलेले आहे. सरकारसोबत मराठा समाजाच्या आंदोलकांनी आता लोकप्रतिनिधींनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. याचाच फटका आज भाजप खासदार हिना गावित यांना बसला.
आंदोलकांनी धुळ्यात हिना गावित यांची गाडी फोडली. त्यानंतर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्जही करावा लागला. तसेच 15 ते 20 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर धुळे जिल्हाधिकारी कार्यालय व शहरात तणावपूर्ण शांतता होती.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)